Headlines

व्होट बँकेसाठी मराठीचा अपमान खपवून घेणार नाही:मराठीच्या मुद्द्यावर सरकार मागे हटत असेल, तर मंत्र्यांनी राजीनामा द्यावा; राऊतांचा आक्रमक पवित्रा




मराठी भाषेचा मुद्दा पुढे करत व्होट बँकेसाठी काम सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये बंगाली, गुजरातमध्ये गुजराती, कर्नाटकात कानडी प्रत्येक राज्यात तिथली स्थानिक भाषा अनिवार्य असायला हवी तर मराठीसाठी तीच भूमिका असायला हवी. या राज्याची भाषा मराठी आहे. व्होट बँकेसाठी तुम्ही मराठीचा अपमान करणार का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, परप्रांतीय लोकांनी त्यांच्या सोयीसाठी मराठी भाषा शिकली पाहिजे. पण त्यांच्याकडून सरकारला आव्हान देण्याची भाषा केली जात आहे. सरकारला आव्हान म्हणजे महाराष्ट्राला आव्हान आहे असे आम्ही मानतो मग सरकार कोणाचेही असो. फडणवीस यांनी गर्जना केली होती मी महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची या गर्जनेचे काय झाले? असा सवाल राऊत यांनी केला आहे. तुम्हाला मागे का हटायचे आहे. लोकं मराठी शिकतील तुम्ही कायदा करा आणि शिकण्यासाठी 6 महिने वेळ द्या. जर मराठीच्या मुद्द्यावर सरकार मागे हटणार असेल तर ज्या मंत्र्यांनी मराठीच्या मुद्दा सुरू केला त्यांनी या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. केईएम नामांतराचा मुद्दा म्हणजे राजकारण केईएम रुग्णालय नामांतराचा विषयावर संजय राऊत म्हणाले की, हे रुग्णालय कित्येक वर्षांपासून रुग्ण सेवा करत आहे. त्यांचे नाव जरी इंग्रज राजाच्या नावावर असले तरी त्या नावाची एक ओळख आहे. गुलामीची प्रतिके नको म्हणणाऱ्या लोढांनी त्यांनी बांधलेल्या टॉवरचे इंग्रजी नावे बदलावीत. ट्रम्प यांच्या नावाने जे टॉवर बांधले आहे त्यांचे नाव बदलून त्यांनी शिवाजी महाराज यांचे नाव त्या टॉवरला दिले पाहिजे. त्यांनी बांधलेल्या टॉवरला महाभारतामधील नावे दिली पाहिजेत. हे सर्व लोक हिंदू होते त्यांची नावे दिली पाहिजेत. केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्याविरोधात आमच्या नेत्यांनी काल तिथे आंदोलन केले. मविआचे नेतृत्व सक्षम नेत्याकडे हवे संजय राऊत म्हणाले की, हर्षवर्धन सपकाळ हे उद्धव ठाकरे यांना भेटले त्यांनी उद्धव ठाकरेंना विनंती केली आहे की विधान परिषदेची जागा तुम्ही स्वत: लढा आणि विधीमंडळात जावे. कारण मविआचे नेतृत्व एका सक्षम नेत्यांकडे असावे त्यामुळे तुम्ही तिथे असले तर आमदारांना नेतृत्व मिळेल. उद्धव ठाकरे यावर निर्णय घेतील. एकच जागा असल्याने त्यांना काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *