Headlines

शाळा विकासासाठी माजी विद्यार्थ्यांची अनोखी गुरुदक्षिणा!:माजी विद्यार्थी अन् ग्रामस्थांकडून एक लाखांची मदत; स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणी ताज्या




ज्या शाळेत आपण शिकलो, संस्कार घेऊन पुढे गेलो त्या शाळेचे ऋण फेडण्याची संधी मिळाली. शाळेच्या गरजा ओळखून शाळेच्या विकासासाठी विद्यार्थ्यांनी तसेच ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन सुमारे एक लाख रुपयांची देणगी शाळेस दिली. पीएमश्री पिसोरेखांड जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेत विद्यार्थी व पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेसाठी हे योगदान मिळाले. ताराचंद जरे यांनी ५० हजार तसेच अजय गावडे यांनी २५ हजार रुपयांची देणगी दिली. स्वप्निल गावडे एक हजार रुपयांची देणगी दिली. शाळेच्या प्रगतीसाठी आणि शैक्षणिक विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी दाखवलेली आत्मीयता या मेळाव्याचे विशेष आकर्षण ठरले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताराचंद जरे होते. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकांनी पंचवीस हजार रुपयांचा सहभाग देऊन इतर शिक्षकांसाठी वेगळा आदर्श निर्माण केला. या देणगीदारांच्या औदार्यामुळे शाळेच्या विकासकार्याला नवी ऊर्जा मिळाली असून शाळा आणि माजी विद्यार्थी यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले. यावेळी वैद्यकीय अधिकारी सांगली येथील प्रदीप इंगळे, विकास इंगळे, सरपंच कैलास येरकळ, उद्योजक अजय गावडे, श्याम जरे, संजय इंगळे, संदीप इंगळे, संदीप ढवळे, शंकर गोरे, इंद्रभान गावडे, हरिश्चंद्र जरे, संतोष कुदांडे, दत्तात्रय जरे, दत्तात्रय खवळे, विजय इंगळे, शरद श्रीराम, राम ओहोळ, विश्वनाथ जगताप, योगेश इंगळे, संदीप चौधरी, सुधाकर इंगळे, सुनील श्रीराम, अण्णा कुदांडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील विद्यार्थिनी सृष्टी इंगळे व सानिका शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जालिंदर इंगळे यांनी केले तर मुख्याध्यापक बापूराव जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक संतोष काळोखे, राहुल गाढवे आणि सुभाष तनपुरे यांनी परिश्रम घेतले. माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार प्रेरणादायी शाळेने दिलेले संस्कार, शिक्षणातून मिळालेले बळ आणि आयुष्याच्या वाटचालीत मिळालेली दिशा यांची जाणीव ठेवून माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी पुढाकार घेणे, ही या स्नेहमेळाव्याची खरी फलश्रुती ठरली. शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि शिक्षक एकत्र आले तर ग्रामीण भागातील शाळाही गुणवत्तेचे आदर्श केंद्र बनू शकतात असा सकारात्मक संदेश या स्नेहमेळाव्याने दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *