![]()
श्रुती संगीत निकेतन प्रस्तुत नाट्य दीपोत्सव या उपक्रमांतर्गत संगीत स्वरसम्राज्ञी नाटकाला नगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवाळीनिमित्त रविवारी सकाळी माऊली सभागृहात रसिकांच्या अलोट गर्दीत तब्बल पाच तास हा प्रयोग रसिकांनी पाहिला, अनुभवला, त्याचा भरभरून आनंद घेतला. कलाकारांचे सहज सुंदर सादरीकरण त्याला मिळणारी रसिकांची भरभरून दाद, अनेक गाण्यांना मिळालेला रसिकांचा वन्समोअरचा मिळत गेलेला प्रतिसाद.. असे दृश्य होते. ज्येष्ठ गायिका अभिनेत्री जयमाला शिलेदार यांच्या पुण्यस्मरणार्थ आणि ज्येष्ठ गायिका अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांना समर्पित हा प्रयोग वैशिष्ट्यपूर्ण होता. ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले यांनी लिहिलेले हे नाटक मराठी रंगभूमी, पुणे निर्मित असून स्वरसम्राज्ञी कीर्ती शिलेदार यांनी या नाटकाचे एक हजारांपेक्षा जास्त प्रयोग केले. त्यांनी गाजवलेली मैनाराणीची अविस्मरणीय भूमिका रसिकांच्या मनात कायमची कोरलेली आहे. त्यातील लावणी गायिका ते शास्त्रीय गायिकेपर्यंतचा प्रवास उलगडण्याचा आणि या नाटकातील सौंदर्य रसिकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने प्रामाणिक प्रयत्न यावर्षी श्रुती संगीत निकेतनच्या स्थानिक कलाकारांनी केला. नाटकाचे दिग्दर्शन डॉ. धनश्री खरवंडीकर यांनी केले असून मैनाराणीची भूमिकाही त्यांनी स्वतः समर्थपणे साकारली. चिन्मय जोगळेकर यांनी केलेली गंगाधरबुवा यांची भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरली. नाटकाचा केंद्रबिंदू असलेली आणि उत्तम साकारलेली ही गुरु शिष्यांची जोडी नगरकर रसिकांना विशेष भावली. या नाटकासाठी उत्कृष्ट साथसंगत ऑर्गन-मकरंद खरवंडीकर, हार्मोनियम- शौनक कुलकर्णी, तबला आणि ढोलकी-शेखर दरवडे, तालवाद्य-अनुज दरवडे यांची होती. या नाटकाचे नृत्य दिग्दर्शन कल्याणी कामतकर यांनी केले. नेपथ्य नाना मोरे, प्रकाश योजना गणेश लिमकर, वेशभूषा मोहिनी खोल्लम, केशभूषा सविता भैरी, ध्वनीव्यवस्था रवी जाधव, रंगभूषा चंद्रकांत सैंदाणे यांची होती. यावेळी धनेश बोगावत, डॉ.हेमंत नाईक, डॉ.चेडे, मालती मोरे, स्नेहा रानडे, अनंत जोशी, अभय जोशी, सदानंद भणगे, पवन नाईक, अविनाश देऊळगावकर, राजाभाऊ मुळे, अशोक गुर्जर, ज्येष्ठ गायक लक्ष्मणराव डहाळे, चंद्रकांत पंडित, वर्षा पंडित, महेश खोपटीकर उपस्थित होते. या नाटकाच्या यशस्वीतेसाठी दीप्ती खरवंडीकर, आर्या कुलकर्णी, स्वराली जोशी, वैष्णवी पटवा, स्वराली गवारे, स्वराली कुलकर्णी, भैरवी हिरवे, ओंकार देऊळगावकर, संदीप कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. कलाकारांच्या अभिनयाला मिळाली कौतुकाची थाप विद्वान आणि जिद्दी शास्त्रीय गायक पंडित गंगाधरबुवा अशिक्षित मैना नावाच्या तमाशातील कलावतीला शास्त्रीय संगीत शिकवून स्वरसम्राज्ञी बनवण्याचे आव्हान स्वीकारतात. त्याला (भैय्यासाहेब आणि हैबती)-अनिकेत देऊळगावकर, (हमीर हिंडोल)-मोहित मेहेर,(तारिणी तानपुरे)-रिद्धी कुलकर्णी, (विमल)-अनुजा कुलकर्णी, (रघुजी राणे)-डॉ. ऋषिकेश कुलकर्णी, (मारुती)- शौनक कुलकर्णी, (राजेश)- समर्थ कोर्टीकर या सर्वांची साथ लाभली. प्रत्येक कलाकाराने रसिकांची मने जिंकून घेतली.
Source link
"संगीत स्वरसम्राज्ञी' नाटकाने जिंकली नगरकरांची मने:दिवाळीनिमित्त आयोजित नाटकाला मिळाला उदंड प्रतिसाद, टाळ्यांच्या कडकडाटात दाद