.

दिवाळी संपताच शहरासह परिसरात हवेत गारवा वाढू लागला आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत २३ अंशांवर असलेला किमान तापमानाचा पारा घसरून आता १५ अंशांवर आला आहे. गेल्या १२ दिवसांत किमान तापमानात तब्बल ८ अंशांची घट झाली आहे. तसेच कमाल तापमान देखील १ अंशाने कमी होऊन ३३ अंशांवर आले आहे.
यंदाचा ऑक्टोबर महिना गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक उष्ण महिना ठरला होता, ज्यामध्ये कमाल तापमान ३६ अंशांवर गेले होते. मात्र, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून निसर्गाने थेट यू-टर्न घेतला आहे. रात्रीच्या आणि पहाटेच्या गारठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, हवामान अंदाजानुसार पुढील आठवड्यात पारा आणखी खाली जाणार आहे. थंडीची तीव्रता वाढू लागल्याने शहरातील उबदार कपड्यांच्या बाजारात खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. गतवर्षी ७ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत किमान १७ तर कमाल २९ अंश तापमान नोंदवले गेले होते.
तारीख किमान कमाल १४ नोव्हेंबर १६ ३४ १५ नोव्हेंबर १७ ३३ १६ नोव्हेंबर १८ ३३ १७ नोव्हेंबर १७ ३३ १८ नोव्हेंबर १७ ३३