![]()
मुक्ताईनगर बोदवड तालुक्यात पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले असताना इंदूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ च्या कामासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याच्या निषेधार्थ आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेने आंदोलन केले. ठेकेदार बी. एन. अग्रवाल यांच्या मनमानी कारभाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी उपस्थित केला. मुक्ताईनगर येथे सुरू असलेल्या महामार्गाच्या कामाच्या ठिकाणी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, पोलीस उपविभागीय अधिकारी नंदराज पाटील, तहसीलदार गिरीश वखारे तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी उपस्थित होते. या आंदोलनावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी बोदवड तालुक्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. एकीकडे दुष्काळसदृश परिस्थिती असताना महामार्गाच्या कामावर लाखो लिटर पाण्याचा वापर होत असून पाइपलाइनमधून गळती होऊन पाणी वाया जात आहे. आपण सत्तेत असतानाही जनतेवर होणारा अन्याय सहन करणार नसून, जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठविणे ही आपली जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत त्यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी केली. पिण्याच्या पाण्याचा रस्त्यासाठी वापर यावेळी आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, बोदवड तालुक्याला पाणीपुरवठा करणारी ही महत्त्वाची पाणीपुरवठा योजना आहे. महामार्गाचे काम सुरू असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पाणीपुरवठ्याची मुख्य पाइपलाइन वाढविण्याच्या दृष्टिकोनातून परवानगी घेतली होती. या पाइपलाइनच्या माध्यमातून बोदवड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, याच मुख्य पाइपलाइनमधून महामार्गाच्या कामासाठी ठेकेदाराकडून पाणी घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दोषींवर नियमानुसार कारवाई करू : सीईओ करिष्मा नायर आंदोलनस्थळी जि.प. सीईओ करिष्मा नायर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मुख्य पाइपलाइन फुटलेली असल्याची माहिती मिळाल्यानंतर पाहणी करण्यासाठी आपण येथे आलो आहोत. संबंधित ठेकेदार हा जिल्हा परिषदेचा नसून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा आहे. त्यामुळे या प्रकरणी संबंधित विभागाला पत्र देण्यात येणार असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मुक्ताईनगर येथे आंदोलनादरम्यान अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आमदार चंद्रकांत
Source link
संताप:महामार्ग कामासाठी पाण्याची नासाडी, शिवसैनिकांकडून रास्तारोको आंदोलन, बोदवड तालुक्यातील पाणीटंचाईवरून आमदार चंद्रकांत पाटील आक्रमक