![]()
दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या सुखदुःखात सहभागी होत शिवसेना सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांनी चांदवड तालुक्यातील दुगाव येथे शेतकऱ्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे म
.
या उपक्रमांतर्गत दुगाव जिल्हा परिषद गटातील शेतकरी रामदास येळंजे आणि केदू आनंदा सोनावणे यांच्या घरी जाऊन चौधरी यांनी त्यांना दिवाळीचा शिधा व कपडे सुपूर्द केले. तसेच दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. येळंजे कुटुंबियांच्या आग्रहाखातर चौधरी यांनी त्यांच्या घरी एकत्र भोजन केले. यावेळी त्यांनी कुटुंबियांशी आपुलकीने संवाद साधला. या संवादादरम्यान शेतीची सद्यस्थिती, दुष्काळामुळे निर्माण झालेल्या समस्या, पाणीटंचाई आणि शेतकरी कुटुंबांसमोरील आर्थिक अडचणी जाणून घेतल्या. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे सांगत त्यांनी शेतकरी कुटुंबांना धीर दिला. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्यक्ष भेटून मदत करण्याबरोबरच त्यांच्या व्यथा आणि समस्या समजून घेण्यावर या उपक्रमातून भर देण्यात येत आहे. यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांना संकटात एकटे पडू देणार नाही ^शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिवाळी साजरी करणे म्हणजे त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवून अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे होय. त्यांच्या घरात चूल पेटते का, शेतात पाणी आहे का, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. दुष्काळात बळीराजाला एकटे पडू देणार नाही. त्यांच्या प्रश्नांची शासनदरबारी मांडणी करून सोडवणुकीसाठी पाठपुरावा करू. – भाऊसाहेब चौधरी, सचिव तथा संपर्क नेते, शिवसेना