Headlines

शिरोडीत अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त गुणवत्तेचा-कर्तृत्वाचा गौरव सोहळा:जि. प. शाळेला विविध प्रकारच्या उपयोगी वस्तू दिल्या भेट‎




शिरोडी येथील ९४ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने रविवारी शिरोडी गावात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या गुणवंत तरुणांचा आणि सेवानिवृत्त ग्रामस्थांचा दिमाखदार गौरव सोहळा उत्साहात पार पडला. “गौरव कर्तृत्वाचा, सोहळा गावाच्या अभिमानाचा”” या बोधवाक्याखाली झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बाबासाहेब महाराज आनंदे यांनी भूषवले. खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार सुहास शिरसाट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक अनिल बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक सर्जेराव श्रीखंडे यांनी केले, अनिल साळुंके यांनी सूत्रसंचालन केले. उद्योजक कैलास भोकरे यांनी आभार मानले. कार्यक्रमात गावातल्या गुणवंत शालेय विद्यार्थ्यांसह वैद्यकीय शिक्षण घेणारे ७, आयआयटीमधील २ विद्यार्थी, सैन्य व पोलिस दलात निवड झालेले ५, पीएचडी पूर्ण केलेले ३, दोन सीए, शासकीय सेवेत व खाजगी व्यवसायात यश संपादन करणारे १५ आणि सेवापूर्तीनंतर ९ सेवानिवृत्त ग्रामस्थांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जिल्हा बँकेचे संचालक अनिल बोरसे यांच्यातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस वॉटर फिल्टर भेट देण्यात आले. आमदार सुहास शिरसाट यांनी शाळेसाठी पोर्टेबल साउंड सिस्टीम तात्काळ उपलब्ध करून दिली. अतुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोडी शाळेची “रयतेची शाळा’ उपक्रमासाठी निवड केली असून, मान्यवरांनी शाळेच्या विकासासाठी आवश्यक सुविधा देण्याची ग्वाही दिली. दिलीप शिरोडकर, सीताराम साळुंके, दत्तात्रय आटुळे आणि सर्जेराव श्रीखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बबन आटुळे, सोमिनाथ श्रीखंडे, विशाल भोकरे व तरुण मित्रमंडळाने विशेष परिश्रम घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *