![]()
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’वर अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मोठी पत्रकार परिषद घेऊन आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय राऊत यांनी एकत्र येत बंडखोरीच्या चर्चांवर थेट कडक शब्दांत प्रहार केला. जर पुन्हा कोणी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रातील जनता गप्प बसणार नाही, असा जाहीर इशारा यावेळी नेत्यांनी दिला. रात्री 11 वाजता फोन आला, 50 कोटींची डील उघड.. पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत यांनी काल रात्रीच्या घडामोडींचा खुलासा केला. काल रात्री ११ वाजेच्या सुमारास मला एका विश्वासू सूत्राने माहिती दिली की, महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्याची मोठी डील झाली आहे. प्रत्येकी ५० कोटी रुपयांना खासदारांना विकत घेतले जात असून, काल रात्रीच १५ कोटींचा ॲडव्हान्स दिला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मी ती लगेच सोशल मीडियावर जाहीर केली,” असे राऊत म्हणाले. कोणी साईबाबांची, तर कोणी आई-मुलाची शपथ घेतली.. खासदार फुटण्याच्या चर्चांवर संताप व्यक्त करताना राऊत यांनी १४ जून रोजी मातोश्रीवर झालेल्या बैठकीचा किस्सा सांगितला. राऊत म्हणाले, आमची १४ तारखेला बैठक झाली, त्याला सर्व खासदार उपस्थित होते. त्या बैठकीत एका खासदाराने ५ वेळा साईबाबांची शपथ घेतली, दुसऱ्याने आई भवानीची शपथ घेतली, तर तिसऱ्याने स्वतःच्या मुलाची आणि आईची शपथ घेतली. बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगणारे हे खासदार जर आता बेईमानी करत असतील, तर ही डरपोकगिरी आहे आणि जनता हा तमाशा खपवून घेणार नाही. हे सर्व खासदार मशाल’ चिन्हावर निवडून आले हे सर्व खासदार ‘मशाल’ चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या मेहनतीवर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना बेईमानी करण्याचा कोणताही अधिकार नाही. “ज्यांना आता जायचे असेल त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग जावे,” असे आव्हान त्यांनी दिले. तसेच, पक्षाने सर्व खासदारांसाठी अधिकृत ‘व्हीप’ जारी केला असून, दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही पक्षाच्या वतीने तातडीने अधिकृत पत्र पाठवण्यात आल्याची माहिती दिली आहे. वर्धापन दिनापूर्वी सुरू असलेल्या या हायव्होल्टेज राजकीय नाटकामुळे महाराष्ट्राचे राजकारण आता टोकाला पोहोचले आहे.
Source link
शिवसेना ठाकरे गटाची पत्रकार परिषद:ऑपरेशन टायगर सोपं नाही; शिवसैनिकांच्या विश्वासाशी गद्दारी केली तर जनता माफ करणार नाही – संजय राऊत