Headlines

श्री अंबादेवी एकविरा मंदिरात आज काकडा आरतीचा समारोप:कार्तिक पौर्णिमेला मोठ्या संख्येत भाविक काकडा आरतीला येणार, अनेक मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन



अश्विन पौर्णिमेपासून ते कार्तिक अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत काकडा आरतीचे आयोजन श्री अंबादेवी, श्री एकवीरा देवी मंदिरांसह विठ्ठल मंदिर, संत श्री गजानन महाराज मंदिरांमध्ये करण्यात आले आहे. या मंदिरांमध्ये दररोज पहाटे ५ वाजतापासून एक महिना काकडा आरती

.

मंगळवार २४ रोजी कार्तिक पौर्णिमेला सर्वच मंदिरांमध्ये काकडा आरतीचा समारोप होणार आहे.यानिमित्त काही ठिकाणी १०८ ज्योती प्रज्वलित केल्या जातील तर हाती काकडा धरून आरती केली जाणार आहे. त्यानंतर गवळणही गायली जाईल. अनेक ठिकाणी काकडा आरतीच्या समारोपानिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री अंबादेवी मंदिर, श्री एकवीरा देवी मंदिरात काकडा आरतीला शेकडो भाविक उपस्थित राहतील, असे संस्थानाद्वारे सांगण्यात आले. मोठ्या संख्येत भाविक घरापुढे सडा, रांगोळ्या घालून फुले अंथरतात. आई अंबादेवीची पूजा करून आशीर्वाद घेतात.

काकडा आरती म्हणजे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर (साधारणपणे पहाटे ४:३० ते ५:३० दरम्यान) गाईच्या शुद्ध तुपात भिजवलेल्या कापसाच्या किंवा सुती कापडाच्या जाड वातीने (काकड्याने) देवीची ओवाळणी करणे होय. रात्रीच्या योगनिद्रेतून आदिशक्तीला जागे करण्यासाठी ही आरती केली जाते.पहाटेची वेळ ही अत्यंत शांत आणि सात्त्विक असते. या वेळी मंदिरात घुमणारे घंटानाद, शंखध्वनी, संबळ-चौघड्यांचे सूर आणि मंत्रोच्चार यामुळे संपूर्ण परिसरात चैतन्य निर्माण होते. काकडा आरतीच्या वेळी देवीला अभिषेक व महावस्त्र अर्पण करून तिचा मूळ शृंगार केला जाणार आहे.

या वेळी होणारे ”मुखदर्शन” अत्यंत शुभ आणि फलदायी असल्याने दर्शनाला मोठ्या संख्येत भाविक गर्दी करतील. दरवर्षी प्रमाणे यंदाही आयोजकांच्या वतीने विशेष व्यवस्था केली आहे. त्यामुळे हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे.

२५ रोजी नगर प्रदक्षिणा कार्तिक पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी कार्तिक कृष्ण प्रतिपदेला अंबादेवीची २५ नोव्हेंबर रोजी नगर प्रदक्षिणा केली जाणार आहे. अनेक वर्षांची परंपरा असून या दिवशी देवी संपूर्ण गावकऱ्यांना दर्शन देण्यासाठी मंदिरातून बाहेर पडते. प्रदक्षिणा घालून व भाविकांना आशीर्वाद देऊन ती परत मंदिरात येते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *