Headlines

संतवचनांचे आचरण केल्यास जीवनाला मिळते योग्य दिशा:रमा एकादशीनिमित्त कीर्तनात नामदेव महाराजांचा उपदेश




संतांचे विचार आणि वचन मानवी जीवनाला योग्य दिशा देणारे आहेत. संतांनी दिलेली शिकवण ऐकण्यापुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्ष आचरणात आणणे आवश्यक आहे. संतांची सेवा, त्यांचे विचार, त्यांनी दाखविलेल्या भक्तिमार्गाचे अनुसरण केल्याने जीवन समृद्ध होते. त्यामुळे प्रत्येकाने संतवचनांनुसार जीवनात आचरण करावे, असे आवाहन पैठण येथील संत गायबा महाराज सदनचे अध्यक्ष रामायणाचार्य नामदेव महाराज पोकळे यांनी केले. रमा एकादशीनिमित्त वाळूज-पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कीर्तन पार पडले. यावेळी दत्ता घोरपडे, शांताराम खिरे आणि मीराबाई खिरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींचा विधिवत महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर दिवसभर मंदिर परिसरात धार्मिक वातावरण होते. कीर्तन सोहळा संपल्यानंतर उपस्थित भाविकांना साबुदाणा खिचडीचे प्रसादरूपाने वाटप करण्यात आले. १५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या पत्रिकेचे विमोचन केले. यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव आप्पासाहेब झळके आदी पदाधिकारी होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *