![]()
शिंदे गटाचे आमदार तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गोलवाडी येथील बंगल्याबाहेर गुरुवारी (१२ नोव्हेंबर) रात्री ११ वाजेच्या सुमारास ३ मद्यपी तरुणांनी गोंधळ घातल्याची घटना घडली. सातारा पोलिस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, या प्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. शिरसाट यांच्या बंगल्याच्या मागील बाजूस काही तरुण मद्यपान करत होते. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना हटकले असता, त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. अनेक ओएसडी माझ्या खिशात आहेत, अशी धमकी देत मद्यपींनी बंगल्याच्या दिशेने रिकाम्या बाटल्या भिरकावल्या. यानंतर सुरक्षारक्षक व मद्यपी यांच्यात झटापट होऊन एक पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाला. माझ्या घरावर हल्ला होतोय, पोलिस आयुक्तांचा फोन बंद शहरात अशा अनेक घटना घडतायेत. दिवसाढवळ्या खून होत आहेत आणि सीपींना त्याचे गांभीर्य नाही. माझ्या घरावर हल्ला होतोय आणि पोलिस आयुक्तांचा फोन बंद आहे. एकही डीसीपी किंवा एसीपी उपलब्ध नव्हता. शेवटी रात्री बारा वाजता राज्याच्या डीजींना फोन करून माहिती दिली. पालकमंत्र्यांची ही अवस्था असेल, तर सर्वसामान्यांचे काय? मी मुख्यमंत्र्यांकडे पोलिस आयुक्तांची नक्कीच तक्रार करणार आहे. संजय शिरसाट, पालकमंत्री
Source link
संभाजीनगरचे पालकमंत्री शिरसाट यांच्या बंगल्याबाहेर 3 मद्यपींचा राडा:दाेन तरुण ताब्यात, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शिरसाटांचा सवाल