Headlines

संभाजीनगरचे 1.95 लाख शेतकरी कर्जमुक्तीच्या दुसऱ्या यादीत पात्र:राज्यातील 3.55 लाख शेतकरी पात्र, मराठवाड्यातील 55%; अमरावती दुसऱ्या, नाशिक चौथ्या क्रमांकावर




राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत ३ लाख ५५ हजार ६१४ शेतकऱ्यांची बहुप्रतीक्षित दुसरी यादी शुक्रवारी जाहीर झाली आहे. या दुसऱ्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर विभागाने (मराठवाडा) संपूर्ण राज्यात बाजी मारली असून, तब्बल १ लाख ९५ हजार ८९९ शेतकरी पात्र ठरले आहेत. एकूण यादीपैकी एकट्या मराठवाड्यात ५५ टक्क्यांहून अधिक शेतकरी लाभार्थी आहेत. पश्चिम विदर्भातील अमरावती विभागाने ७१ हजार ७९६ शेतकऱ्यांसह राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभाग २५ हजार ४७१ पात्र खात्यांसह चौथ्या स्थानावर राहिला आहे. ही यादी जिल्हानिहाय आणि बँकनिहाय जारी करण्यात आली असून संबंधित बँक शाखा, विकास सोसायट्या व ग्रामपंचायतींमध्ये ती उपलब्ध आहे. दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ अखेरची कर्ज थकबाकीची रक्कम तपासून नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन तातडीने आधार प्रमाणीकरण करावे. यामुळे थेट बँक खात्यात कर्जमुक्तीची रक्कम वर्ग होईल, असे आवाहन सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या पहिल्या यादीतील आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या १२ लाख ५८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर दोन टप्प्यांत १० हजार ११४ कोटी ९० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. जाणून घ्या तुमच्या विभागातील लाभार्थी (पात्र शेतकरी) संख्या
परतफेड न झालेले २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *