Headlines

संभाजीनगर जिल्ह्यात 5.46लाख, राज्यात 1.80 कोटी मतदार वगळले जाऊ शकतात:मराठवाड्यातील 20 लाख मतदारांचा थांगपत्ता नाही




मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये सध्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) सुरू आहे. त्यात २० लाख ३५ हजार मतदारांचा शोध घेताना बूथ लेव्हल ऑफिसरांची दमछाक होत आहे. स्थलांतरित झाल्याने आणि तांत्रिक अडचणींमुळे मतदारांचे डिजिटायझेशन खोळंबले आहे. १७ ऑगस्टपर्यंत हे मतदार आढळले नाही तर त्यांची नावे यादीतून वगळली जाण्याची भीती आहे. दरम्यान, राज्यातील ९.७८ कोटीपैकी सुमारे १.८० कोटी मतदारांनी अद्याप गणना प्रपत्र (फॉर्म) भरलेले नाही. त्यामुळे २४ ऑगस्टला प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे. जून महिन्यापासून मराठवाड्यात विशेष पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हा निवडणूक विभागाच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व बीएलओ या उपक्रमावर लक्ष केंद्रित करून आहेत. मराठवाड्यात १.५७ कोटी मतदारांना पुनरीक्षणाचे अर्ज वाटप करण्यात आले होते. त्यापैकी १.३५ कोटी मतदारांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असले, तरी २०.३५ लाख मतदारांचे काम अद्याप बाकी आहे. त्यामुळे हे मतदार सध्या तरी प्रशासकीय कागदपत्रांवर न सापडलेले ठरत आहेत. बीएलओ एकाच कुटुंबाच्या घराचे तीन-तीन वेळा उंबरठे झिजवत आहेत, तरीही संबंधित नागरिकांची माहिती मिळत नसल्याने कर्मचारी हतबल झाले आहेत. याशिवाय अर्जांचे मॅपिंग करतानाही गंभीर तांत्रिक अडचणी येत आहेत. विशेषतः २००२ मध्ये आपण कोणत्या गावात मतदान केले होते, हे ग्रामीण भागातील नागरिकांना सांगता येत नाही. तसेच तीन अपत्ये असलेल्या कुटुंबांचे मॅपिंग सिस्टीम स्वीकारत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या सुनावणीदरम्यान मोठा गोंधळ उडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. १.५७ कोटी अर्ज वाटप, १.३५ कोटी मतदारांचे डिजिटायझेशन जून महिन्यापासून मराठवाड्यात विशेष पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला. जिल्हा निवडणूक विभागाच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व बीएलओ उपक्रमावर लक्ष केंद्रित करून आहेत. मराठवाड्यात १.५७ कोटी मतदारांना पुनरीक्षणाचे अर्ज वाटप करण्यात आले. त्यापैकी १ कोटी ३५ लाख मतदारांचे डिजिटायझेशन पूर्ण असले, तरी २०.३५ लाख मतदारांचे काम अद्याप बाकी आहे. अर्जांच्या मॅपिंगची तांत्रिक अडचण कायम मतदारांकडून अर्ज भरून घेतल्यानंतर त्यांचे आई, वडील किंवा आजी-आजोबांच्या नोंदींशी मॅपिंग केले जात आहे. मात्र, २००२ मधील मतदान केंद्र न सापडणे, जुन्या यादीत नाव न असणे आणि जन्मतारखेमधील वयाच्या अंतरातील विसंगती यांमुळे अनेक अर्ज अनकलेक्टेड श्रेणीत जात आहेत. मराठवाड्यातील जिल्हानिहाय मतदारांची आकडेवारी (लाखांत)
जिल्हा एकूण मॅपिंग मिसिंग
संभाजीनगर ३२.१६ २५.८२ ५.४६
नांदेड २७.७७ २३.८१ ३.७९
बीड २१.९३ १९.५० २.४१
जालना १६.८२ १४.३४ २.२९
लातूर २०.०४ १७.७२ १.९५
परभणी १५.४१ १३.६० १.८०
धाराशिव १४.१३ १२.२७ १.७७
हिंगोली ९.६९ ८.८३ ०.८५ व्होटर हेल्पलाइन ॲप किंवा पोर्टलची मदत जे मतदार स्थलांतरित झाले किंवा सापडत नाहीत त्यांची नावे वगळली जातील. मृत व्यक्तींची नावे आणि ज्यांची दोन ठिकाणी नोंद आहे त्यातील एका ठिकाणचे नाव कमी केले जाईल. यासाठी यापूर्वीच दोन वेळा मुदतवाढ दिली आहे. मतदारांना व्होटर हेल्पलाइन ॲप किंवा पोर्टलवर जाऊन २००२ ची व नवीन यादी पाहता येईल. तेथूनच ऑनलाइन अर्जही करता येईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *