![]()
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने साईनगरी शिर्डीतील बाजारपेठेत खरेदीची लगबग वाढू लागली आहे. कपडे, मिठाई, इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती साहित्य, फटाके, आकाशकंदील आणि सजावटीच्या वस्तूंनी दुकाने सजली असून दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ सुरू झाली आहे. मात्र, पारंपरिक छोट्या दुकानां सह मोठ्या मॉलमध्ये खरेदीदारांचा ओढा अधिक असल्याचे चित्र दिसत आहे. आकर्षक सवलती, विविध वस्तूंची उपलब्धता आणि एकाच छताखाली संपूर्ण कुटुंबाला खरेदी करता येत असल्याने ग्राहक मॉलला पसंती देत आहेत. शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्याने येथे साईबाबा संस्थानचे सुमारे सहा हजार कर्मचारी कार्यरत आहेत. दरवर्षी दिवाळीच्या काळात संस्थान कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस आणि सानुग्रह अनुदान स्थानिक बाजारपेठेच्या आर्थिक उलाढालीला मोठी चालना देतो. या काळात कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय कपडे, किराणा, मिठाई, इलेक्ट्रॉनिक्स तसेच घरगुती वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. त्यामुळे दिवाळी हा शिर्डीतील व्यापाऱ्यांसाठी वर्षातील महत्त्वाच्या आर्थिक हंगामांपैकी एक मानला जातो. यंदाही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी दुकानांमध्ये विविध वस्तूंची सजावट आणि मालाची उपलब्धता केली आहे. बाजारपेठेतील कापड दुकाने, मिठाईची दुकाने, इलेक्ट्रॉनिक्स आणि किराणा दुकानांमध्ये दिवाळीची तयारी दिसून येत आहे. दुसरीकडे मोठ्या मॉलमध्ये विविध कंपन्यांच्या वस्तू, सणासुदीच्या विशेष सवलती आणि आकर्षक खरेदी योजना ग्राहकांना आकर्षित करत आहेत. त्यामुळे पारंपरिक बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या तुलनेत मॉलमध्ये कुटुंबासह खरेदी
Source link
सण-उत्सव:दिवाळीनिमित्त शिर्डीची बाजारपेठ फुलली; छोट्या दुकानांसह मॉलमध्ये खरेदीदारांचा ओढा अधिक