Headlines

सदगुणांचा अतिरेक करून गप्प बसू नका: डॉ. संजय उपाध्ये:विराट हिंदू मेळाव्यात मार्गदर्शन; 'पुन्हा श्रीकृष्ण येणार नाही, प्रत्येकाने श्रीकृष्ण होण्याची वेळ'




अधर्माची वाढ झाल्यानंतर मी जन्म घेतो असे श्रीकृष्णाने सांगितले असले तरी, हिंदूंनी आता सदगुणांचा अतिरेक करून गप्प बसायचे नाही, संख्याबळ दाखवणे ही आजची गरज आहे. बुद्धिवादाच्या नादामध्ये साहित्यिक बुद्धिभेद करीत आहेत. अस्तित्वाचा मुद्दा उपस्थित झाला, तर विवेक बाजूला ठेवावा लागेल. हिंदूंनो एकत्र आलो नाही, तर युरोपियन राष्ट्राप्रमाणे भारतात परिस्थिती उद्भवू शकते. पुन्हा ‘श्रीकृष्ण’ येणार नाही, तर प्रत्येकाने ‘श्रीकृष्ण’ होण्याची वेळ आली आहे असे मार्गदर्शन ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी ‘धर्मसंस्थापनार्थाय’ या विषयावर व्याख्यान देताना केले. नवरात्र उत्सव व विजयादशमी निमित्त हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी, (दि.२५) हिंदू शौर्य दिन – विराट हिंदू मेळाव्यामध्ये ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांच्या हस्ते डॉ. अभिजीत सोनवणे यांना ‘स्व. प्रा. एकनाथजी नाणेकर स्मृती समाजभूषण पुरस्कार २०२६’; ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांना ‘स्व. संजय आर्य स्मृती पत्रकार भूषण पुरस्कार २०१६’ आणि निलंगा येथील श्री राधाकृष्ण फाउंडेशनचे संस्थापक आकाश सोळंके यांना ‘कार्य गौरव पुरस्कार २०२६’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. उत्तम दंडीमे, उपाध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, सचिव सुहास पोफळे, समन्वयक कैलास बारणे मिलिंद एकबोटे, मंदार देशपांडे, चंद्रकांत नखाते, योगिता बारणे, सुरेश भोईर, सुरेंद्र करमचंदानी, सविता एकनाथ नाणेकर, सुजाता पोफळे, महेश कुलकर्णी, अर्थ सल्लागार अनुजा घाडगे, अतुल जोशी आदी उपस्थित होते. डॉ. उपाध्ये पुढे म्हणाले की, या राष्ट्रासाठी ज्या अल्पसंख्याकांनी आपले कर्तृत्व दाखवले त्यांना देशवासीयांनी डोक्यावर घेतले. ७५ वर्षात ५ शिक्षण मंत्री अल्पसंख्यांक होते. अन्य देशातील अल्पसंख्याकांपेक्षा भारतातील अल्पसंख्यांक सुरक्षित आणि विकासाचे जास्त लाभार्थी आहेत. भारता शेजारील देशात हिंदूंची संख्या कमी होत असताना भारतात अल्पसंख्याक यांची संख्या वाढत आहे हे चिंताजनक आहे. आतापर्यंतच्या शिक्षणाने हिंदुत्वाची वाट लावली आहे. अकबरच मोठा झाल्याचे शिक्षण ठरवून दिले. आता राजकारण सोडून सर्वांनी देशहित डोळ्यापुढे ठेवून एकत्र येणे आवश्यक आहे. अन्यथा युरोपातील देशाप्रमाणे आपल्या देशाची परिस्थिती होण्याची भीती डॉ. उपाध्ये यांनी व्यक्त केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *