![]()
प्रतिनिधी । अमरावती शहरापासून सुमारे दहा ते बारा किलोमीटर वर मार्डी मार्गावरील घातखेडच्या जवळ तलावात बुडून चार मुला-मुलींचा मृत्यू झाला. प्रत्यक्षात घातखेड तलाव हा फारसा परिचित पर्यटनस्थळ किंवा स्पॉट नाही. या मुलांनाही या ठिकाणाची माहिती नव्हती. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना घातखेड तलावाविषयी माहिती मिळाली. त्यानंतर शनिवारी रात्रीच दुसऱ्या दिवशी या ठिकाणी डबा पार्टी करण्याचे नियोजन त्यांनी केले. त्यानुसार सर्वजण डबा पार्टीसाठी तलावाजवळ गेले; मात्र हा तलाव त्यांच्यासाठी घात ठरल्याने एकाच वेळी चार मुला-मुलींचा तलावात बुलडून मृत्यू झाला. सोनाली नरेंद्र जोशी (१६), आदित्य उर्फ मानव नरेंद्र जोशी (१३), पायल बबलू पंडित (२१) आणि यश गजानन काकणे (१३, सर्व रा. खोलापुरी गेट) अशी मृत मुला-मुलींची नावे आहेत. या चौघांव्यतिरिक्त आचल (१६), सलोनी (१७), नंदिनी (२१), आदित्य (१७), कार्तिक (१३), उर्वरित. पान ४ नकारात्मक बातमी पण, तुमच्या माहितीसाठी महत्त्वाची खोलापूरी गेट भागात पसरली शोककळा सोनाली ही पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत होती. आदित्य उर्फ मानव आठवीत शिकत होता. पायल ही पदवीच्या अंतिम वर्षात होती, यश सातव्या वर्गात शिक्षण घेत होता. एकाच वेळी एकाच परिसरातील चार मुला-मुलींच्या आकस्मिक निधनामुळे परिसरात शोक व्यक्त होत आहे. ही माहिती मिळताच परिसरातील असंख्य नागरिकांनी घटनास्थळी तसेच इर्विन रुग्णालयात धाव घेतली होती. नरेंद्र जोशी यांना दोन मुली, एक मुलगा. त्यापैकी मुलगा मानव, मुलगी सोनाली यांचा मृत्यू झाला. दोघांचेही मृतदेह पाहून नरेंद्र जोशी यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यांनी त्यांच्या तीन मुलांसह इतर सात अशा दहा मुलांना डबा पार्टीसाठी तलावाजवळ सोडले होते; मात्र दोन तासांत त्यांना या घटनेची माहिती मिळाली. मुला, मुलीचा मृतदेह पाहून त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
Source link
समाज माध्यमावर मिळाली घातखेडा तलावाची माहिती;रात्री पार्टीचे प्लॅनिंग:तलावात बुडून मृत्यू झालेल्यांमध्ये सख्ख्या बहिण भावांसह चौघांचा समावेश