![]()
सांगली येथे आयोजित १७ व्या राज्यस्तरीय कॅनो स्प्रिंट अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६ तसेच राज्यस्तरीय खुल्या गटाच्या ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील विल्होळी येथील स्वाभिमान बोट क्लबच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत दुहेरी उपविजेतेपद पटक
.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला सांगलीचे आदित्यराजे पटवर्धन, मुख्य जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहल कणीचे, महाराष्ट्र कॅनो-कयाक असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रताप जामदार, सचिव सुरेंद्र कोरे, भारतीय कॅनो-कयाक संघटनेचे सहसचिव दत्ता पाटील, गणेश बरगाले, शेखर बजाज यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विजेत्या व सहभागी खेळाडूंचे कौतूक करत त्यांचा सन्मान केला.
या यशामागे प्रशिक्षक वैभव नवले आणि तुकाराम डांगे यांनी खेळाडूंमध्ये जिद्द, शिस्त आणि स्पर्धात्मकता निर्माण करत त्यांनी सातत्यपूर्ण प्रशिक्षण दिले. त्यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे स्वाभिमान बोट क्लबने राज्यस्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली असून भविष्यात राष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय यश संपादन करण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
नाशिक जिल्ह्यासाठी हे यश अभिमानास्पद व प्रेरणादायी ठरत असून, जलक्रीडा क्षेत्रातील नवोदित खेळाडूंना यामुळे नवी दिशा आणि प्रेरणा मिळणार आहे.
जिद्द आणि मेहनतीचे फळ ^खेळाडूंनी कठोर मेहनत, शिस्त आणि समर्पणाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. दुहेरी उपविजेतेपद ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी असून, याचे सर्व श्रेय खेळाडूंच्या जिद्द आणि चिकाटीला जाते. आगामी राष्ट्रीय स्पर्धांमध्येही नाशिक जिल्ह्याचा झेंडा उंचावण्यासाठी आम्ही अधिक जोमाने तयारी करू. – वैभव नवले व तुकाराम डांगे, प्रशिक्षक