Headlines

सातारा गुन्हेगारी वार्ता: फॉरेस्ट कॉलनी परिसरात चेन स्नॅचिंग; तर मारहाण प्रकरणी आठ जणांविरोधात परस्परविरोधी तक्रार दाखल



सातारा येथील फॉरेस्ट कॉलनी परिसरात चेन स्नॅचिंग केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 27 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लता वसंतराव टकले राहणार विलासपूर सातारा या वृद्धा फॉरेस्ट कॉलनी व गणेश नगर यांना जोडणाऱ्या लहान पुलावरून जात असताना दोन अज्ञातांनी त्यांच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाचे व 25 हजार रुपये किंमतीची एकसर गळ्यातून हिसकावून घेऊन गेले आहेत. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत.

मारहाण प्रकरणी आठ जणांविरोधात परस्परविरोधी तक्रारी

मारहाण प्रकरणी आठ जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शेतातील बांधाच्या कारणावरून हिम्मत लक्ष्मण साळुंखे रा. कारंडवाडी, ता. सातारा तसेच त्यांच्या आई वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी प्रवीण पांडुरंग साळुंखे, संग्राम पांडुरंग साळुंखे, तुकाराम सिद्धू साळुंखे, विठ्ठल सिद्धू साळुंखे, प्रज्योत जयवंत गोरे (सर्व रा. कारंडवाडी, ता. सातारा) यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हवालदार राऊत करीत आहेत.

दरम्यान प्रवीण पांडुरंग साळुंखे यांच्या फिर्यादीनुसार, हिम्मत लक्ष्मण साळुंखे, लक्ष्मण महादेव साळुंखे, छाया लक्ष्मण साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पिसाळ करीत आहेत.

सेवानिवृत्त शिक्षकाची सुमारे साडेसहा लाखांची फसवणूक; दोन जणांवर गुन्हा

सेवानिवृत्त शिक्षकाची सुमारे साडेसहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी शरद सदाशिव धेंडे (रा. गोडोली, सातारा) यांना दि. एक सप्टेंबर ते पाच नोव्हेंबर दरम्यान सौरभ द्विवेदी आणि एका महिलेने (दोघेही रा. हैदराबाद) फोनवरून आम्ही आय आर डी ए ऑफिस मधून बोलत असल्याचे सांगून धेंडे यांच्याकडून वेगवेगळी कारणे सांगून 6 लाख 52 हजार 711 रुपये घेऊन फसवणूक केली आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटोळे करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *