Headlines

सूर महती महोत्सव 14 आणि 15 नोव्हेंबरला:डॉ. अरविंद थत्ते आणि डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा सन्मान; पुण्यात संगीत, सरोद आणि कथकचे कार्यक्रम




पुण्यात १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी सूर महती महोत्सव २०२६ होणार आहे. सूर महती फाउंडेशनने स्व. संगीत महामहोपाध्याय डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा महोत्सव आयोजित केला आहे. टिळक रस्त्यावरील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलमागील फरशी मैदानावर सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत कार्यक्रम होतील. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत, सरोद वादन आणि कथक नृत्य सादर केले जाईल. १४ नोव्हेंबरला सुरश्री जोशी आणि चिन्मयी ओक यांचे सहगायन होईल. त्यानंतर अभिषेक बोरकर यांचे सरोद वादन आणि अबंती भट्टाचारजी यांचे ठुमरी-दादरा गायन होईल. पं. संजीव अभ्यंकर यांच्या शास्त्रीय गायनाने पहिल्या दिवसाची सांगता होईल. १५ नोव्हेंबरला अतुल खांडेकर यांच्या शास्त्रीय गायनाने कार्यक्रम सुरू होईल. त्यानंतर पद्मश्री पं. गोपीकृष्ण यांच्या शिष्या आणि ज्येष्ठ कथक नृत्यांगना पंडिता मनीषा साठे कथक सादर करतील. मानपत्र प्रदान सोहळ्यानंतर पं. साजन मिश्रा आणि स्वरांश मिश्रा यांचे सहगायन होईल. महोत्सवात संगीत आणि समाजप्रबोधन क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. अरविंद थत्ते आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथील प्राध्यापक डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा सन्मान होईल. डॉ. हरी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते त्यांना मानपत्र दिले जाईल. डॉ. अरविंद थत्ते यांनी भारतीय शास्त्रीय संगीतात एकल हार्मोनियम वादन आणि साथसंगतीद्वारे योगदान दिले आहे. त्यांनी मल्लिकार्जुन मन्सूर, वसंतराव देशपांडे, के. जी. गिंडे, कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी, पं. जसराज, सी. आर. व्यास, जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर, मालिनी राजूरकर, प्रभा अत्रे, परवीन सुलताना, लक्ष्मी शंकर, विजय सरदेशमुख आणि शोभा गुर्टू यांना हार्मोनियमची साथ केली आहे. साथसंगतकार म्हणून ओळख निर्माण करण्यासोबतच त्यांनी एकल वादनही केले आहे. महोत्सवात लीलाधर चक्रदेव, प्रणव गुरव, अरविंद भट्टाचारजी, मालू गावकर, केदार टिकेकर, अर्पिता वैशंपायन, वल्लरी आपटे, सुनील अवचट, निखिल फाटक, राजीव तांबे, अजिंक्य जोशी, अभिषेक शिनकर, पांडुरंग पवार आणि सुयोग कुंडलकर साथसंगत करतील. डॉ. वंदना बोकिल-कुलकर्णी महोत्सवाचे सूत्रसंचालन करतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *