Headlines

सौदी-मुंबई विमानात टॉयलेटमध्ये सिगारेट ओढली:मुंबई विमानतळावर केरळच्या प्रवाशाला अटक




सौदी अरेबियाहून मुंबईकडे येणाऱ्या विमानात धूम्रपानबंदीचे नियम धाब्यावर बसवत टॉयलेटमध्ये सिगारेट ओढणाऱ्या केरळमधील एका प्रवाशाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. विमानातील केबिन क्रूच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. टॉयलेटमधून धूर येताच प्रकार उघड मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाहून मुंबईकडे येणाऱ्या विमानात ‘नो स्मोकिंग’चे स्पष्ट निर्देश असतानाही केरळमधील ३४ वर्षीय नुरी बहुलेयन याने उड्डाणादरम्यान विमानाच्या टॉयलेटमध्ये सिगारेट ओढली. टॉयलेटमधून धूर बाहेर येत असल्याचे लक्षात येताच केबिन क्रूने तातडीने तपास केला. त्यावेळी संबंधित प्रवासी टॉयलेटमधून बाहेर येताना आढळला आणि त्याच्यावर संशय बळावला. मुंबई विमानतळावर उतरल्यावर कारवाई विमान मुंबई विमानतळावर पोहोचताच केबिन क्रूने संपूर्ण प्रकाराची माहिती सुरक्षा यंत्रणांना दिली. त्यानंतर सहार पोलिसांनी नुरी बहुलेयन याला ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणी त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५ तसेच एअरक्राफ्ट अॅक्ट, १९३७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानातील धूम्रपान गंभीर गुन्हा विमानात धूम्रपान करणे हा गंभीर सुरक्षा नियमांचा भंग मानला जातो. अशा प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विमान कंपन्या आणि सुरक्षा यंत्रणा अशा घटनांबाबत कठोर भूमिका घेत असून संबंधित प्रवाशांवर कायदेशीर कारवाई केली जाते. हेही वाचा.. राज्यात पावसाचा जोर ओसरला: घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट, मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा गेले काही दिवस राज्याला झोडपून काढणाऱ्या मान्सूनने आता बहुतांश भागांत ब्रेक घेतल्याचे चित्र आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरला असून काही ठिकाणी उघडीप मिळाली आहे. मात्र, असे असले तरी आज 4 ऑगस्ट (मंगळवार) रोजी विदर्भातील काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींची शक्यता आहे. सविस्तर वाचा खासगी वाहनांवर ‘पोलिस’ पाटी लावणे भोवणार!: राज्यभर कडक कारवाईचे आदेश, अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी कठोर पाऊल राज्यातील खासगी दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असे लिहिणाऱ्यांवर किंवा तशी लाल पाटी लावून फिरणाऱ्यांवर लवकरच कडक कारवाई होणार आहे. वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक कार्यालयाने यासंदर्भात गांभीर्याने दखल घेतली असून, राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांना तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खासगी वाहनांवर अशी पाटी लावण्यावर थेट निर्बंध येणार आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *