![]()
प्रतिनिधी |अकोला स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतीकारक तयार करण्याची फॅक्टरी होते. त्यांनी अनेक क्रांतीकारक निर्माण केले, असे प्रतिपादन माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर यांनी केले. ते जुने शहरातील रेणुकानगर भागातील रेणुका माता मंदिराजवळील स्वा. वि. दा. सावरकर स्मारक येथे आयोजित जयंतीदिनी ते बोलत होते. स्वर्गीय इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना त्यांनी सावरकरांचे डाक तिकीट प्रसिद्ध केले व त्यांच्या मुंबई येथील स्मारकासाठी स्वत: जवळचे ११ हजार रुपये देणगी दिली, असे मनोगत दिवेकर यांनी व्यक्त केले. यावेळी बाजीराव वझे, दिलीप देशपांडे, उदयजी आदींनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन निखिलेश दिवेकर यांनी केले होते. सूत्रसंचालन निखिलेश दिवकेर, सुधीर देशपांडे यांनी केले. नगरसेवक निलेश देव यांनी उपस्थितांचे आभार मानले. या वेळी अजय चव्हाण, पत्रकार श्रीकांत जोगळेकर, नितीन देशमुख, सुयोग रानडे, जयंत मराठे, मुकुंद कुलकर्णी, महादेव मेहेंगे, उदय थत्ते, महेश मोडक, नाना कुलकर्णी, आनंद जागिरदार, अनिरुद्ध खरे, सतीश खोडवे आदींची यावेळी उपस्थिती होती.
Source link
स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतीकारकतयार करण्याची फॅक्टरीच होते:माजी उपमहापौर दिवेकर; जुने शहरात स्वा. सावरकर जयंती उत्साहात