Headlines

हिंदू इकॉनॉमिक फोरमचे 'शक्ती समिट 2026' पुण्यात:6 जून रोजी उद्योग परिषदेत विविध क्षेत्रांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन




हिंदू इकॉनॉमिक फोरम (एचईएफ) पुणे जिल्हा चॅप्टरतर्फे शनिवार, 6 जून 2026 रोजी ‘शक्ती समिट 2026’ या भव्य उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद पाषाण येथील पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये (पीआयसी) सकाळी 9 ते सायंकाळी 6.30 या वेळेत पार पडेल. फोरमच्या पुणे जिल्हा चॅप्टरचे अध्यक्ष गौरव त्रिपाठी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. परिषदेचे उद्घाटन वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक व चेअरमन प.पू. स्वामी विज्ञानानंद, भाजप नेत्या श्वेता शालिनी, ‘मित्रा’चे नियामक मंडळ सदस्य दीपक करंजीकर आणि उद्योजक डॉ. मनोज पोचट यांच्या हस्ते होईल. समारोप केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे सांस्कृतिक व आयटी मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत होणार आहे. या एकदिवसीय परिषदेत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये संरक्षण व अंतराळ क्षेत्रातील ‘रेअर अर्थ’चे भू-राजकीय महत्त्व, नवतंत्रज्ञान आणि युद्धतंत्र यावर विक्रम धूत, हर्षवर्धन गुणे, डॉ. प्रतिक किशोर, प्रशांत जोगळेकर, ब्रिगेडियर वीरेश श्रीवास्तव आणि सुरेंद्र वैद्य मार्गदर्शन करतील. ‘विकसित भारत’ मोहिमेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) भूमिकेवर वरुण खंदारे, किरण जाधव, रावळनाथ शेंडे, अजय भागवत आणि चेतन धारिया चर्चा करतील. रेल्वे व पायाभूत सुविधा या विषयावर डॉ. हेमंत सोनवणे, सुमित गर्ग आणि अरुण कुमार उद्योग क्षेत्रातील संधींवर भाष्य करतील. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डिजिटल परिवर्तन या सत्रात मनीष भारद्वाज, प्रशांत पानसरे, विकास महाजन मार्गदर्शन करतील. शिक्षण व प्रशासनातील एआयच्या वापराबाबत अनुराग तिवारी आणि अनुपमा बस्रूर हे तज्ज्ञ माहिती देतील. ‘हिंदू मंदिरांचे अर्थकारण’ या विषयावर शेफाली, गिरीश कुलकर्णी आणि प्रशांत सचान चर्चा करतील. तर ‘ज्ञान, माध्यम आणि कथानक शक्ती’ या सत्रात शहजाद पूनावाला व इतर मान्यवर आपले विचार मांडतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *