शिरजगावात वीज कर्मचाऱ्याविरोधातसंताप; बदली न केल्यास आंदोलन:लाईनमविरोधात सहाय्यक अभियंता मनीषा चाभारेंना दिले निवेदन
शिरजगाव येथील महावितरणचे वीजतंत्री (लाईनमन) भूषण गाडगे यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या आठ दिवसांत त्यांची बदली करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे. याबाबत ग्रामस्थांनी मोझरी येथील सहाय्यक अभियंता मनीषा चांभारे यांना निवेदन देत, ठोस कारवाई न झाल्यास कार्यालयासमोर ‘धडक आंदोलन’ करण्याचा इशारा दिला आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार, संबंधित लाईनमन गेल्या अनेक दिवसांपासून…