अहिल्यादेवींच्या जलसंवर्धनाचा वारसा पुढे नेत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू:जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचा निर्धार
श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईनगरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयजयकार घुमला. अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून निघालेल्या दोन्ही जलयात्रांचे सोमवारी शिर्डीत आगमन झाले. अ . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ‘गोदा ते नर्मदा’ या विशेष जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेचे वैशिष्ट्य…