नव्या पंपांमुळे कन्नडचा पाणीपुरवठा सुरळीत:नगरपालिका कर्मचाऱ्यांनी अंबाडी धरणावर रात्रभर जागून बसवले विद्युत पंप
कन्नड शहराला अंबाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जात असून, अत्यल्प जलसाठ्यामुळे विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरसेवक अब्दुल जावेद यांनी कर्मचाऱ्यांसोबत रात्रभर पाण्यात उभे राहून नवे विद्युत पंप बसवून घेतले आहेत. त्यामुळे आता कन्नडचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. कन्नड शहराला अंबाडी प्रकल्पातून ग्रॅव्हिटीद्वारे पाणीपुरवठा होतो. मात्र, या प्रकल्पात सध्या केवळ ११ टक्के जलसाठा शिल्लक…