Headlines

माजी आमदार बी.टी. देशमुख अनंतात विलीन:सरकारी इतमामात पार पडले अंत्यसंस्कार, दोन मुलींनी दिला मुखाग्नी

विधान परिषदेत ३० वर्षे अमरावती पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे दिवंगत माजी आमदार प्रा. बी.टी. देशमुख यांच्यावर शनिवारी सायंकाळी सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री सचिवालयाच्या विशेष आदेशानुसार, हिंदू स्मशानभूमीत हा विधी पार पडला. त्यांच्या दोन मुली, वैशाली वानखडे आणि दीपा लाड, यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्याशी संघर्ष करत असलेल्या प्रा. देशमुख…

Read More

21 जून वर्षातील सर्वात मोठा दिवस:दिनमान 13 तास 13 मिनिटे, उत्तर गोलार्धात 'समर सॉलस्टाईस'चा अनुभव घ्या

खगोलप्रेमी आणि जिज्ञासूंसाठी आजचा रविवार (२१ जून) हा दिवस महत्त्वाचा आहे. उत्तर गोलार्धात रविवारी वर्षातील सर्वात मोठा दिवस अनुभवता येणार असून, दिनमान १३ तास १३ मिनिटांचे असेल. मराठी विज्ञान परिषदेच्या स्थानिक शाखेचे पदाधिकारी विजय गिरुळकर आणि प्रा. प्रवीण गुल्हाने यांनी नागरिकांना या खगोलीय घटनेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचे आवाहन केले आहे. भारतात, म्हणजेच उत्तर गोलार्धात, २१…

Read More

नगरपरिषदा/नगरपंचायतींमधील 38 रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया संपन्न:सरासरी 71.84 टक्के मतदान, उद्या मतमोजणी

राज्यातील १४ जिल्ह्यांतील ८ नगरपरिषदा व १४ नगरपंचायतींमधील एकूण ४७ रिक्त पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. नामनिर्देशनपत्रे माघारी घेतल्यानंतर १० जिल्ह्यांतील ७ नगरपरिषदा आणि ७ नगरपंचायतींसाठी एकूण ३८ रिक्त जागांसाठी आज २० जून २०२६ रोजी मतदान घेण्यात आले असून या निवडणुकीत सरासरी ७१.८४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे…

Read More

भयपट आणि सस्पेन्सचा प्रभाव वाढवण्यासाठी ‘वन’चे रीशूट होणार:सिद्धार्थ-तमन्नाचा चित्रपट त्याच्या अतिरिक्त शूट शेड्यूलमुळे चर्चेत

भारतीय सिनेमात गेल्या काही वर्षांपासून हॉरर चित्रपटांची भाषा वेगाने बदलली आहे. आता केवळ भीतीदायक दृश्येच नव्हे, तर वातावरण, लोककथा आणि मानसिक ताणतणाव देखील प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत. याच बदलत्या काळात ‘वन: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ आपल्या अतिरिक्त शूटिंग शेड्यूलमुळे चर्चेत आहे. सिद्धार्थ आणि तमन्ना भाटिया अभिनीत ‘वन’ या चित्रपटातील हॉरर आणि सस्पेन्सचा थरार वाढवण्यासाठी निर्मात्यांनी…

Read More

जिल्हा परिषदेच्या 67 शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती:समुपदेशनाद्वारे प्रक्रिया पूर्ण, सीईओ गांधींच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी

अमरावती जिल्हा परिषदेतील ६७ शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती देण्यात आली आहे. समुपदेशनाद्वारे ही प्रक्रिया नुकतीच पार पडली असून, या शिक्षकांवर आता केंद्रप्रमुखांची नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही पदोन्नती प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुमती याचिका तसेच संबंधित सर्व न्यायालयीन प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पार पाडण्यात आली. जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात मुख्य कार्यकारी…

Read More

मोरगडमध्ये पाणीटंचाई:आदिवासी झिऱ्यातून काढताहेत पाणी, माखल्याची विहीर निकामी; नागरिकांची 2 किमी पायपीट

मेळघाटात पावसाळा सुरू होऊनही पाणीटंचाई कायम आहे. चिखलदरा तालुक्यातील मोरगड येथील आदिवासींना गावाशेजारील नदीपात्रात झिरा (छोटा खड्डा) खोदून पाणी मिळवावे लागत आहे. दुसरीकडे, प्रशासनाने तयार केलेली माखल्याची विहीर बंद पडल्याने नागरिकांना दोन किलोमीटरची पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच ही समस्या भेडसावत आहे. मोरगड गावात गेल्या आठ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण…

Read More

ज्यांना परत यायचंय त्यांनी यावे, ठाकरेंचे मन मोठे:ओमराजे निंबाळकरांचे तळ्यात-मळ्यात असो पण डुबायला नको – आदित्य ठाकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा आणि त्यांच्या वडिलांच्या हत्या प्रकरणाचा सीबीआय कोर्टाचा निकाल, यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेवर, पक्षातील बंडखोर खासदारांवर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेवर अत्यंत आक्रमक आणि रोखठोक प्रतिक्रिया…

Read More

पत्रकार हेमंत निखाडे यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार:कृषी पत्रकारितेतील योगदानाबद्दल शासनाकडून सन्मान

अमरावती: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शुक्रवारी विविध पुरस्कार जाहीर केले. यामध्ये तिवसा तालुक्यातील पत्रकार हेमंत निखाडे यांना पत्रकारिता गटातून प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. लवकरच मुंबई येथे एका विशेष समारंभात निखाडे यांना त्यांच्या पत्नीसह हा पुरस्कार प्रदान केला जाईल. हेमंत निखाडे गेल्या २१ वर्षांपासून तिवसा तालुक्यात कृषी पत्रकारिता करत आहेत. कृषी…

Read More

एडीसीसी बँकेच्या विशेष सभेला न्यायालयाचा ब्रेक:शेअर मूल्यवाढीच्या निर्णयावर चर्चा करण्यास मनाई, पुढील सुनावणी 1 जुलैला

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (एडीसीसी) २१ जून रोजी होणारी विशेष सभा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे रद्द करण्यात आली आहे. बँकेचे संचालक रवींद्र गायगोले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय आला. या सभेत शेअरचे मूल्य वाढवण्यावर चर्चा होणार होती, ज्याला न्यायालयाने मनाई केली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने…

Read More

पंजाबमध्ये बनावट व्हिडिओचा कट उघड:CM मान यांनी जत्थेदारांची भेट घेतली होती, व्हिडिओ त्यांचा नसल्याचे सांगितले होते

पंजाबच्या राजकारणात मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांना बदनाम करण्यासाठी रचलेला एक मोठा कट आता पूर्णपणे उघड होताना दिसत आहे. ज्या व्हिडिओवरून विरोधक आणि काही राजकीय शक्ती सतत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत होत्या, त्याच प्रकरणात मुख्यमंत्री भगवंत सिंह मान पहिल्या दिवसापासून एकच गोष्ट सांगत होते की, हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट आहे आणि त्याची चौकशी झाली…

Read More