Headlines

सातारा-सांगलीत महायुतीत ‘ऑपरेशन नाराजी’ची चर्चा!:भाजपचे मतदार सुरक्षितस्थळी, एकनाथ शिंदेंची भूमिका ठरणार महत्त्वाची

महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकांपूर्वी राजकीय वातावरण कमालीचे तापले असून सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक विशेष चर्चेत आली आहे. वरवर पाहता महायुती एकत्र असल्याचे चित्र असले, तरी पडद्यामागे सुरू असलेल्या नाराजीच्या राजकारणामुळे सत्ताधारी आघाडीची चिंता वाढली आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येत असल्याने या निवडणुकीत…

Read More

कर्जमाफीवरून रविकांत तुपकर आक्रमक:बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस; ‘आश्वासन नको, विनाअट सरसकट कर्जमुक्ती हवी’

महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शेतकरी नेते राज्य सरकारविरोधात आक्रमक होताना दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलडाणा येथे सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांच्या हिताची नसून केवळ दिखाऊ आणि दिशाभूल करणारी असल्याचा गंभीर आरोप करत तुपकर यांनी…

Read More

हिंगोलीत विवाहितेवर अत्याचार करून अश्लील व्हिडिओ काढला:ब्लॅकमेल करत पुन्हा अत्याचार, दोन तरुणांविरुद्ध गुन्हा

हिंगोली जिल्ह्यातील एका विवाहित महिलेला धमकी देऊन अत्याचार केला अन अश्लील व्हिडिओ काढून बदनामीची धमकी देणाऱ्या एका तरुणासह दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 15 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास कामाला गती दिली असून दोन्ही आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील…

Read More

22 जूनपर्यंत टेलिग्रामवर बंदी, नीट री-एक्झाममुळे निर्णय:मेसेज एडिट फीचर देखील 30 जूनपर्यंत बंद; 21 जून रोजी परीक्षा होईल

भारत सरकारने NEET-UG च्या पुनर्परीक्षेच्या संदर्भात भारतात टेलिग्राम मेसेजिंग ॲपच्या वापरास तात्पुरती बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने मंगळवारी एक प्रेस रिलीज जारी करून ही माहिती दिली. NTA ने सांगितले की, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 69A अंतर्गत टेलिग्रामवर बंदी घातली आहे. ही…

Read More

पंढरपुरात हायव्होल्टेज ड्रामा:रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप आक्रमक; शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांमुळे विठ्ठलनगरी अशुद्ध झाली म्हणत गोमूत्र शिंपडलं

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या पंढरपूर येथील आंदोलनस्थळी आज भाजप कार्यकर्त्यांकडून थेट गोमूत्र आणि चंद्रभागेचे तीर्थ शिंपडून ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळवणवार यांनी हा प्रकार केला आहे. सरकारी कारखाने, बँका आणि दूध संघ डबघाईला आणणाऱ्या लोकांच्या आंदोलनामुळे विठ्ठलाची पंढरी अशुद्ध झाली होती,…

Read More

नाशिक विधान परिषदेत ‘इनसाइड गेम’ची चर्चा!:वसंत गीतेंच्या एका वक्तव्याने महायुतीची चिंता वाढली; 18 जूनला नेमकं काय घडणार?

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत विजय जवळपास निश्चित मानला जात असतानाही महायुतीच्या गोटात अस्वस्थता दिसून येत आहे. जिल्ह्यात महायुतीकडे तब्बल 450 मतदारांचे स्पष्ट बहुमत आहे, विरोधी पक्षाचा अधिकृत उमेदवारही मैदानात नाही, तरीही सत्ताधारी आघाडीने आपल्या नगरसेवकांना ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’च्या माध्यमातून सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे निवडणुकीआधीच राजकीय संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे….

Read More

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरण:तब्बल 20 वर्षांनंतर आज अंतिम निकालाची शक्यता; खासदार निंबाळकर मुंबई सत्र न्यायालयात हजर

राज्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा तब्बल 20 वर्षांनंतर आज अंतिम निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. मुंबई सत्र न्यायालयात आज सकाळी 11 वाजता या संवेदनशील खटल्याची सुनावणी होणार असून, अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. या सुनावणीसाठी पवनराजे निंबाळकर यांचे सुपुत्र आणि खासदार ओमराजे निंबाळकर हे आपल्या संपूर्ण…

Read More

आधार कार्डचा वापर फक्त ओळखीसाठी व्हावा:आज SC मध्ये सुनावणी; याचिकेत दावा – सध्या पत्ता, जन्मतारखेचा पुरावा मानला जातो

सर्वोच्च न्यायालय आज आधार कार्डच्या वापरासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करणार आहे. याचिकेत म्हटले आहे की, आधार कार्डचा वापर ओळखपत्रापलीकडे जाऊन नागरिकत्व, निवास आणि जन्मतारखेच्या पुराव्यासाठी केला जात असेल, तर कायद्याने याला परवानगी नाही. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यात आधार कार्डचा वापर केवळ ओळखीच्या पुष्टीकरणापुरता मर्यादित ठेवण्याचे निर्देश देण्याची…

Read More

मेहकरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा बुलंद!:काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा ठाकरे गटाला पाठिंबा; शिंदे गटाला मोठा राजकीय धक्का

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहराच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून महाविकास आघाडीने नगरपालिकेत आपले वर्चस्व आणखी मजबूत केले आहे. काँग्रेसच्या 11 पैकी तब्बल 9 नगरसेवकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे मेहकर नगरपालिकेतील सत्तासमीकरण पूर्णपणे बदलले असून महाविकास आघाडीचे संख्याबळ 16 वर…

Read More

Mumbai MNS Worker FIR; White Line Controversy

मुंबईतील जैन समाजासाठी रस्त्यावर काढण्यात आलेल्या कथित ‘पांढऱ्या पट्टी’च्या वादाने आता राजकीय आणि कायदेशीर स्वरूप धारण केले आहे. या प्रकरणात आंदोलन करत पांढऱ्या पट्टीवर स्प्रे मारणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यावर पोलिसांनी गु . मात्र, या कारवाईनंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत प्रशासनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सार्वजनिक रस्त्यांवर परवानगीशिवाय पांढऱ्या पट्ट्या रंगवणाऱ्यांवर कारवाई का होत…

Read More