Headlines

हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्याने केळीच्या बागा उध्वस्त:20 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज, प्रशासाकडून पंचनामा सुरु

हिंगोली जिल्ह्यात शनिवारी ता. १३ वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कळमनुरी व वसमत तालुक्यात केळी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार केळीच्या बागांचे सुमारे २० कोटी रुपयांचे नुकसान असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तर हिंगोली तालुक्यातील पहेणी येथे ६० ते ७० घरावरील टीनपत्रे उडून गेली आहेत. हिंगोली जिल्हयात वसमत व कळमनुरी तालुक्यात केळीचे पिक अधिक प्रमाणात घेतले…

Read More

शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन:पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात होणार सोहळा

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ऐतिहासिक शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात दि. २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. हे संमेलन चार दिवसांचे असून ते ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी आज (दि. १४) पत्रकार परिषदेत दिली….

Read More

MP- मुरैना येथे ट्रेनखाली येऊन 4 प्रवाशांचा मृत्यू:यांमध्ये 3 महिला, एक मूल; आगीच्या अफवेमुळे उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनखाली आले

मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात रेल्वेखाली चिरडून ४ लोकांचा मृत्यू झाला. आग लागल्याच्या अफवेनंतर उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेसमधून खाली उतरलेले चार प्रवासी दुसऱ्या ट्रेनच्या धडकेत आले. या अपघातात तीन महिला आणि एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेरहून मुरैनाकडे जाणाऱ्या उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये कोणत्यातरी कारणामुळे आग लागल्याची अफवा पसरली. याच दरम्यान जवळच्या रुळावर धौलपूरहून पातालकोट एक्सप्रेस…

Read More

माळशिरस येथे पिकप गाडी विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू:विहिरीला कठडा नसल्याने भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

सोलापूर येथील माळशिरस येथे पिकअप गाडी विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्याच्या बाजूलाच ही विहीर होती आणि या विहिरीत पिकप गाडी कोसळून यात 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात घडल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले असून ही गाडी विहीरीच्या बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदुळवाडीजवळ हा भीषण…

Read More

उपोषण लय बेकार, हाडं ठिसूळ होतात!:सरकारने चर्चेला बोलावल्यास मार्ग काढावा; मनोज जरांगेंचा रोहित पवारांना मोलाचा सल्ला

राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’तील जाचक अटी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात पुकारलेल्या ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी रोहित पवार यांचे आंदोलनस्थळी भेट दिली. तसेच रोहित पवारांसोबत त्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर चर्चा देखील…

Read More

FSSAI Notice: Misleading Food Names Violation

नवी दिल्ली50 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने रविवारी देशातील 8 मोठ्या फूड कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कंपन्यांवर त्यांच्या उत्पादनांची ब्रँड नावे, ट्रेड नावे आणि जाहिरातींमध्ये ग्राहकांची दिशाभूल करणारे दावे केल्याचा आरोप आहे. नियामकाने स्पष्ट केले आहे की, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ॲक्ट, 2006 अंतर्गत अशी…

Read More

डीएसकेच्या जप्त गाड्या स्वस्त देण्याचे आमिष, लाखो रुपयांची फसवणूक:कार एजंटने अनेकांना गंडा घातला; खडक पोलिसांत गुन्हा दाखल

पुण्यात डी.एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्या जप्त केलेल्या गाड्या स्वस्त दरात मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. एका कार एजंटने अनेकांना गंडा घातला असून, त्याच्याविरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी एजंट पैसे घेऊन फरार झाला आहे. या प्रकरणी अदनान शब्बीर शेख (वय २३, रा. नाईक बिल्डिंग, मोमीनपुरा,…

Read More

भारतीय सैन्याने दूर केल्या गुलामगिरीच्या काळातील खुणा:आता परेडमध्ये रिव्ह्यूइंग अधिकारी तलवार ठेवणार नाही; प्रथमच फॉर्मल ड्रेसमध्ये बंदी जॅकेटचा समावेश

भारतीय लष्कराने जवानांच्या गणवेशातून गुलामगिरीच्या काळातील खुणा काढून टाकल्या आहेत. 174 पानांच्या नवीन ‘आर्मी युनिफॉर्म-2026’ पुस्तकात वसाहतवादी काळातील नियमांमध्येही बदल केले आहेत. हे बदल भारताच्या सार्वभौम ओळखीनुसार आणि राष्ट्रीय भावनेनुसार करण्यात आले आहेत, असे लष्कराने म्हटले आहे. नवीन नियमांनुसार, परेडमध्ये रिव्ह्यूइंग ऑफिसरसाठी तलवार ठेवणे ऐच्छिक करण्यात आले आहे. तसेच, काही मेस ड्रेससोबत वापरली जाणारी पाउच…

Read More

वाशिममध्ये हृदयद्रावक घटना:पत्नीसह दोन चिमुकल्यांना विहिरीत फेकून स्वतःने घेतला गळफास, नेमके प्रकरण काय?

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील तिवळी गावात एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूची एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, वडिलांनी प्रथम आपली पत्नी आणि दोन मुलांना विहिरीत ढकलून दिले व त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, मृत महिलेच्या भावाने या घटनेवर तीव्र संशय व्यक्त केला असून, हा आत्महत्येचा प्रकार नसून घातपात असल्याचा…

Read More

काजोल म्हणाली- आमिरला चित्रपटांबद्दल जबरदस्त समज:मस्करीत म्हटले- महिलांबद्दलची समजही चांगली, ऐकून अभिनेता हसला

आमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि ‘आमिर खान प्रोडक्शन्स’च्या २५ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात काजोलने आमिरच्या चित्रपटांच्या निवडीचे कौतुक केले. काजोल म्हणाली की, आमिरच्या प्रोडक्शन कंपनीने ‘लगान’पासून आतापर्यंत उत्कृष्ट चित्रपटांची निवड केली आहे, जे त्याच्या उत्तम निवडीचे प्रदर्शन करते. यानंतर काजोलने विनोदी शैलीत सांगितले की, आमिरला चित्रपटांप्रमाणेच महिलांबद्दलही चांगली समज आहे. यावर अभिनेता…

Read More