स.प. महाविद्यालयाची भाविका भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार:19 वर्षांखालील महिला संघाचे नेतृत्व करणार, महाविद्यालयाचा गौरव
सर परशुरामभाऊ महाविद्यालयाची इयत्ता १२ वीची विद्यार्थिनी भाविका अहिरे हिची १९ वर्षांखालील भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार म्हणून निवड झाली आहे. ती बंगळूरु येथील क्रिकेट अकादमीमध्ये रुजू होऊन श्रीलंका संघासोबतच्या आगामी दौऱ्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या निवडीबद्दल महाविद्यालयात भाविकाचा सत्कार करण्यात आला. शि.प्र. मंडळीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राधेश्याम अग्रवाल यांच्या हस्ते हा सत्कार…