अकोल्यात चेंबरचे विदर्भ मुख्यालय- रुहाटिया:महाराष्ट्र चेंबरच्या विदर्भ उपाध्यक्षपदी सिद्धार्थ रुहाटिया यांची बिनविराेध निवड; काैतूकाचा वर्षाव
राज्यातील व्यापार व उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य आणि नामांकित संघटना असलेल्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर च्या विदर्भ उपाध्यक्षपदी अकोल्याचे प्रसिद्ध उद्योजक सिद्धार्थ रुहाटिया यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत विदर्भाने ऐतिहासिक यश संपादन केले असून, विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांचे उपाध्यक्षही अनविरोध निवडून आले आहेत. सिद्धार्थ रुहाटिया यांच्यासह विदर्भातून सुमित मालाणी, अमित पडगिलवार,…