Headlines

दिव्य मराठी स्टिंग:सायबर ठग वापरतात मुंबईतल्या चाेर बाजारातील माेबाइलचा डेटा, ई-कचऱ्यातून डेटा चाेरीचे रॅकेट

घरातील फुटलेला किंवा पूर्णपणे डेड मोबाइल भंगार समजून गल्लोगल्ली फिरणाऱ्या भंगारवाल्यांकडे विकणे धोक्याची घंटा ठरत आहे. हा डेड फोन सायबर गुन्हेगारांसाठी कोट्यवधींची खाण आहे. असे मोबाइल तोकड्या किमतीत वा प्लास्टिक वस्तूंच्या बदल्यात विकत घेऊन त्यांची रॅम मुंबईतील कामाठीपुरातीलचोर बाजारातून थेट चीन, हाँगकाँगच्या सायबर माफियांपर्यंत पोहोचवल्या जात असल्याचा प्रवास ‘दिव्य मराठी’ने स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस आणला आहे….

Read More

सलमान खान पार्टीत नवीन लूकमध्ये दिसला:मिठी मारून आमिरने ॲब्सना स्पर्श केला, दोघांनी एकत्र फोटोही काढला

आमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि ‘आमिर खान प्रोडक्शन्स’च्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत एका सेलिब्रेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी या कार्यक्रमात सलमान खान, करीना कपूर आणि रेखा यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक मोठे सेलिब्रिटी उपस्थित होते. कार्यक्रमात सलमान खान आपल्या नवीन अल्ट्रा-शॉर्ट हेअर लूकमध्ये पोहोचला, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सोशल मीडियावर…

Read More

कुर्डुवाडीतील अपघातात 1 ठार, चार जण जखमी:डीसीसी बँकेचे अधिकारी अनिल बाबर गतप्राण‎

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (डीसीसी बँक) अधिकारी अनिल कोंडीबा बाबर (वय ५८, रा. टेंभुर्णी,) यांचे शनिवार दि. १३ रोजी टेंभुर्णी- कुर्डुवाडी रोडवर माळी पाटीजवळ असलेल्या वळणावर २ वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात निधन झाले. तर चारचाकी गाडीतील चालकासह चौघे जखमी झाले आहेत. माढा तालुक्यात सीनिअर बँक इन्स्पेक्टर (वरिष्ठ शाखा निरीक्षक) या पदावर कार्यरत असलेले…

Read More

इर्ले येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार:कै.पाटील यांच्या स्मरणार्थ, 10 वी, 12 वी मधील यशवंतांचा गौरव‎

शिक्षणाचा वारसा जपत गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने इर्ले येथे पाटील परिवाराच्या वतीने कै. उद्धवरावजी पाटील व कै. अंबादास (नाना) पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेला गुणवंतांचा सत्कार व स्नेहमेळावा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमात गावातील गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रांत यश संपादन करणारे युवक-युवती, शिक्षक तसेच मान्यवरांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शालिनी…

Read More

CBI च्या रडारवर हरियाणा केडरचा IPS अधिकारी:औषध घोटाळ्यात दिलासा दिल्याचा ठपका, PI मार्फत 3 कोटींचा व्यवहार

पुडुचेरीशी संबंधित 5 कोटी रुपयांच्या बनावट औषध घोटाळ्यातील मुख्य आरोपीला चौकशीत दिलासा देण्यासाठी हरियाणा कॅडरच्या 2012 बॅचच्या एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचे नाव समोर आले आहे. आरोपीसोबत 3 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचेही उघड झाले आहे. सीबीआयच्या रडारवर आलेल्या या आयपीएस अधिकाऱ्याची ओळख पटली आहे, परंतु सध्या त्यांच्या नावाचा अधिकृतपणे सार्वजनिक खुलासा करण्यात आला नाही. हा अधिकारी…

Read More

शिव रस्त्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा लढा:सावळी दातुरा येथील गजानन कौतीककर यांचे शेत झाले पडीक‎

अचलपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या सावळी दातूरा येथील शेतकऱ्यांची मौजे मुरादपूर व सावळी दातुरा येथे शेतजमीन आहे. या शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी सावळी ते हनवतखेडा ही डांबरी सडक आहे. सदर रस्त्याने गेल्यावर डावीकडे वळून दक्षिणेकडील रस्त्यावरील एका शेतकऱ्याने शेतीची मोजणी केल्यामुळे शिवरस्ता (वहिवाट) बंद झाला आहे. त्यामुळे त्या रस्त्याचा वापर करून शेती करणाऱ्या ७ ते ८ शेतकऱ्यांपुढे…

Read More

नसरापूर चिमुकली अत्याचार-खून खटला अंतिम टप्प्यात:राज्याच्या इतिहासातील सर्वात जलद खटला ठरण्याची शक्यता; महिनाभरात निकालाची चिन्हे

पुणे जिल्ह्यातील नसरापूर (ता. भोर) येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या क्रूर अत्याचार आणि खून प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या खटल्याचे कामकाज अत्यंत वेगाने आणि दररोज चालवले जात असून, आतापर्यंत तब्बल ५३ महत्त्वपूर्ण साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयात नोंदविण्यात आल्या आहेत. येत्या महिनाभराच्या आतच या प्रकरणाचा अंतिम निकाल लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून,…

Read More

नियुक्ती मोर्शीत असतानाही कामकाज अमरावतीतून सुरु; शेतकऱ्यांचा आरोप

पदोन्नतीद्वारे मोर्शी वन परिक्षेत्रात नियुक्ती मिळालेले सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व अतिक्रमण निर्मूलन) हे आपल्या अधिकृत नियुक्तीच्या ठिकाणी हजर न राहता अमरावती येथील मुख्य कार्यालयातूनच कामकाज करतात. त्यामुळे मोर्शी परिसरातील शेतकरी, वनहक्कधारक आणि सामान्य नागरिकांची मोठी हेळसांड होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपवनसंरक्षकांना यासंदर्भात निवेदन सादर करून सखोल चौकशीची मागणी…

Read More

दुचाकीस्वाराच्या डोक्यात शिरले बाईकचे फुटरेस्ट:कटरने कापून काढले, बालोदमध्ये ओव्हरटेक करताना अपघात; VIDEO

छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात शनिवारी बसला ओव्हरटेक करत असताना दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुसऱ्या दुचाकीचे फुटरेस्ट नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याच्या डोक्यात घुसले. खूप प्रयत्नांनंतर कटरच्या मदतीने फुटरेस्ट कापून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील दाम्पत्याला किरकोळ दुखापत झाली आहे. प्राथमिक तपासणीत पोलिसांनी अपघाताचे कारण…

Read More

अकोल्याला ताशी 32.50 लाख लिटर्स पाणीपुरवठा:मुख्य जलकुंभातून ग्रॅव्हिटी द्वारे संपूर्ण अकोला शहराला वितरण, माेठा दिलासा‎

महान अकोला शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी महान येथे उभारण्यात आलेल्या दोन जलशुद्धीकरण केंद्रांतून दररोज शहराला लाखो लिटर्स पाणी पुरवले जात आहे. महान धरणातून ग्रॅव्हिटी द्वारे पाणी जलशुद्धीकरण केंद्रातील फाऊंटनमध्ये आणले जाते. सर्वप्रथम पाण्यात तुरटी टाकली जाते. त्यानंतर हे पाणी क्लॅरिफायरमध्ये सोडून गाळ मुक्त केले जाते. फिल्टर प्लांटमध्ये पाणी शुद्ध झाल्यावर त्यात ब्लिचिंग पावडर व…

Read More