Headlines

सलमानच्या सेक्युरिटीला आमिरच्या मुलाला ओळखता आले नाही:ना दिखावा, ना स्टारचा ॲटिट्यूड; जुनैदला ओळखण्यात सुरक्षा पुन्हा चुकली

आमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि ‘आमिर खान प्रोडक्शन्स’च्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत एका सेलिब्रेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी या कार्यक्रमात सलमान खानसह बॉलिवूडमधील अनेक मोठे सेलिब्रिटी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सलमानला भेटण्यासाठी आमिर खानचा मुलगा जुनैद पोहोचला. मात्र, सलमानच्या सुरक्षा रक्षकांना जुनैदला ओळखता आले नाही आणि त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न…

Read More

पत्रकारांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी:शेवगाव पोलिस ठाण्यात निवेदन

सोशल मीडियाचा गैरवापर करून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेची आणि पत्रकार बांधवांची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या एका विकृताच्या कृत्याविरोधात शेवगाव तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. सोशलवर एका व्हिडिओ पोस्टखाली पत्रकारांविषयी आक्षेपार्ह, अवमानकारक शब्दप्रयोग केल्याच्या निषेधार्थ शेवगाव येथील तमाम पत्रकार बांधवांच्या वतीने शेवगाव पोलीस ठाण्यात पोलिसांना निवेदन देण्यात आले आणि संबंधिताच्या अटकेची मागणी करण्यात आली. शेवगाव…

Read More

कल्याणमधील भीषण अपघातात रीलस्टार प्रेम भाटीचा मृत्यू:कुटुंबावर शोककळा, रस्त्यावरील खडी अन् खड्ड्यांमुळे दुचाकी घसरल्याचा आरोप

सोशल मीडियावर आपल्या विनोदी आणि हॉरर रील्स तयार करणारा प्रेम भाटीचा भीषण अपघातात मृत्यू झाला. 13 जून रोजी पहाटेच्या सुमारास कल्याणमधील मोहने परिसरात रस्त्यावरील खड्डे आणि खडीमुळे दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने प्रेम भाटीचा दुर्दैवी अंत झाला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम भाटी 13 जून रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आपल्या घरी परतत होता. मोहने येथील शिवसेना शाखेजवळून…

Read More

IG च्या मानेवर दगड लागला, पोलिसांकडून गोळीबार:अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पाटलीपुत्र स्टेशनवर उमेदवारांच्या गोंधळाचे 15 फोटो

पाटलीपुत्र रेल्वे स्टेशनवर शिपाई भरती परीक्षेच्या उमेदवारांनी रात्री उशिरा जोरदार गोंधळ घातला. व्यवस्थेवर नाराज झालेले विद्यार्थी ट्रेनच्या इंजिनवर चढले. विद्यार्थ्यांनी ट्रॅकवर उतरून गाड्या थांबवल्या. प्रवासी गाड्यांवर दगडफेकही करण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरही दगड फेकण्यात आले. यात सेंट्रल रेंजचे आयजी जितेंद्र राणा यांच्या मानेला दुखापत झाली आहे. प्रकरण इतके वाढले की उमेदवारांना हटवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे…

Read More

मुंबईत पांढऱ्या पट्ट्यांवरून मनसे विरुद्ध जैन मुनी आमनेसामने:आमच्या नादाला लागू नका; संदीप देशपांडेंचा जैन धर्मगुरू निलेशचंद्रांना थेट इशारा

घाटकोपर आणि दादरनंतर आता चर्नी रोड परिसरातही जैन धर्मीयांकडून रस्त्यांवर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांमुळे मुंबईतील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि जैन धर्मगुरूंमध्ये थेट शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. “तुम्ही मासे खाऊ नका म्हणून इतरांना भाग पाडणे आणि सार्वजनिक रस्ते रंगवणे हा ‘सांस्कृतिक दहशतवाद’ आहे,” अशी घणाघाती टीका मनसे…

Read More

मुलगा होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ:परभणी येथील सासरच्या 9 जणांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मुलगा होत नसल्याच्या कारणावरून तसेच माहेरावरून 5 लाख रुपये घेऊन येण्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या नऊ जणांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात रविवारी ता. 14 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालु्क्यातील कारवाडी येथील नंदा यांचा विवाह परभणी येथील महेंद्र कांबळे याच्या सोबत झाला होता. विवाहानंतर काही दिवस चांगले वागविल्यानंतर सासरच्या मंडळींनी त्यांना…

Read More

उद्धव अन् राज ठाकरेंनी एकत्र येऊन देशाचे राजकारण करावे:धारावीत मराठी माणसाला हात लावला तर अदानींशी थेट टक्कर- संजय राऊत

जे लोक आमचा पक्ष फुटणार अशी आवई उठवत आहेत, त्यांची शिवसेना हे नाव घेण्याचीही पात्रता नाही. हे पळपुटे लोक आम्हाला काय शिकवणार? अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ..तर यासोबतच त्यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत एक मोठे विधान केले आहे. संजय राऊत म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता महाराष्ट्राच्या राजकारणातून…

Read More

डिंपल म्हणाल्या- अदितीवरील कमेंट्समागे भाजप:आता लक्ष वळवण्याचा प्रयत्न सुरू; अखिलेश म्हणाले- पोलिसांना आरोपींना शोधता येत नसेल, तर आम्ही मदत करू

अदितीसंबंधी जी विधाने झाली आहेत, त्यामुळे ते खूप अस्वस्थ आहेत. असे भाजपवाले म्हणत आहेत. हे सर्व लोक तुमची दिशाभूल करत आहेत. ही जी वक्तव्ये झाली आहेत, ती भाजपच्या लोकांनीच करवून घेतली आहेत, पण आपल्याला लक्ष विचलित होऊ द्यायचे नाही. कारण यामागे खरे कारण राम मंदिरातील चोरीचे आहे. या मुद्यावरून लक्ष हटवण्यासाठी हा मुद्दा आणला गेला…

Read More

रोहित पवारांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस:प्रकृती खालावली; सरकारला आजच्या दिवसाचा अल्टिमेटम, उद्या विठ्ठल मंदिराच्या पायरीवर ठिय्या

राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’तील जाचक अटी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात पुकारलेल्या ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन सुरू असून, दिवसेंदिवस या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. मात्र, तिसऱ्या दिवशी रोहित…

Read More

सह्याद्री पर्वतरांगेतील कळसूबाईच्या पायथ्याशी भ्रष्टाचाराचे “शिखर’:बारी ग्रा.पं.त दुसऱ्या गावांचे फोटो टाकून लाखो रुपये लाटल्याचा आरोप‎

अकोले महाराष्ट्रातील समुद्रसपाटीपासूनचे सर्वोच्च ठिकाण असलेल्या सह्याद्री पर्वतरांगेतील ‘कळसूबाई शिखर’ ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते, त्याच आदिवासीबहुल आणि दुर्गम बारी ग्रामपंचायतीत विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा . वर्ष २०२४ ते २०२६ या कालावधीत हा घोटाळा झाला असून, देवेंद्र काशिनाथ खाडे व स्थानिक ग्रामस्थांनी याविरोधात जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत वरिष्ठ स्तरावरून चौकशीची मागणी…

Read More