Headlines

राम मंदिराच्या दानपेटीतून 5 कोटींचा अपहार:पैसे चोरणारा कोण? संजय राऊतांचा मोदी सरकारवर थेट हल्ला; अयोध्या दौऱ्याची घोषणा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप आणि केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतून तब्बल 5 कोटी रुपयांचा अपहार झाला आहे. हे रामललाच्या चरणी आलेले पैसे वारंवार कोण चोरत आहे?” असा खळबळजनक सवाल उपस्थित करत राऊतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More

सांगलीत माथाडी नेत्याच्या घरात घुसून गोळीबार:14 वर्षांच्या नातवाचा जागीच मृत्यू, व्यावसायिक वादातून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

सांगली शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगलीच्या भरवस्तीत एका माथाडी नेत्याच्या घरात 4 ते 5 अज्ञात हल्लेखोरांनी घुसून अंधाधुंद गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात माथाडी नेत्याच्या अवघ्या 14 वर्षांच्या निष्पाप नातवाचा गोळ्या लागून मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळच्या सुमारास घडलेल्या या थरारनाट्यामुळे संपूर्ण सांगली जिल्हा हादरला असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे….

Read More

बल्क युझर्सच्या पेट्रोल पंपावरील खरेदीवर 90 दिवसांची बंदी:आता केवळ घाऊक केंद्रांवर पेट्रोल – डिझेल मिळणार; रेटच्या फरकामुळे निर्णय

सरकारने औद्योगिक, व्यावसायिक आणि संस्थात्मक म्हणजेच सर्व मोठ्या वापरकर्त्यांना (बल्क युजर्सना) किरकोळ पेट्रोल पंपांवरून पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यावर बंदी घातली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, आता या ग्राहकांना केवळ घाऊक विक्री केंद्रांमधून (बल्क सेल पॉइंट्स) इंधन खरेदी करावे लागेल. ही बंदी सुरुवातीला 90 दिवसांसाठी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर…

Read More

जैनांच्या ‘पांढऱ्या पट्टी’च्या वादाला नवं वळण:प्रसाद वेदपाठक यांचे इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड, सोशल मीडियावर संताप

मुंबईतील घाटकोपर परिसरात जैन समाजासाठी सार्वजनिक ठिकाणी काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या वादानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या मुद्द्यावर सोशल मीडियावर आवाज उठवणारे डिजिटल कंटेंट क्रिएटर आणि ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांचे इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. यामुळे सोशल मीडियावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक भावना आणि सार्वजनिक जागांचा वापर या मुद्द्यांवर पुन्हा चर्चा…

Read More

ममतांच्या पराभवानंतर 14 दिवसांनीच TMC मध्ये फूट:बंडखोरांचे 18 मे रोजी अध्यक्षांना पाठवलेले पत्र समोर, त्यावर 19 खासदारांच्या सह्या

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस म्हणजेच TMC मध्ये फूट ममतांच्या पराभवानंतर अवघ्या 14 दिवसांनीच पडायला सुरुवात झाली होती. बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल 4 मे रोजी लागला होता. 14 दिवसांनंतर म्हणजेच 18 मे रोजी 19 खासदारांनी बंडखोरी करत लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले. बंडखोर खासदारांनी वेगळा गट स्थापन करण्याची मागणी केली आहे. अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रावर ज्या 19 खासदारांनी…

Read More

अल्पवयीन मुलीची दाेन लाखांत विक्री:मुली विकणारी टाेळी नाशकात अटकेत, नाशिक जिल्ह्यातील हरसूल येथील घटना

आईचे छत्र हरपलेल्या 16 वर्षीय मुलीला मोबाईल आणि नविन कपडे घेऊन देण्याचे अमिष दाखवून तिचे नाशिक जिल्ह्यातील हरसूलनजीकच्या गावातून अपहरण करण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर गावात तिचा बाल विवाह करून देण्यात आला. तेथील वरासाठी मुलगी शोधून देण्याकरिता 2 लाखांची दलाली घेतलेला संशयित आणि पतीसह 10 संशयितांना हरसूल पोलिसांनी अटक केली. तुषार पाचपिंड…

Read More

काँग्रेसचे मिशन विलीनीकरण!:शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह ममता बॅनर्जीनाही प्रस्ताव, नाना पटोले म्हणाले- देश वाचवण्यासाठी काँग्रेससोबत यावे लागेल!

राज्यात आणि देशाच्या राजकारणात सध्या एक नवी चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), तृणमूल काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का, या चर्चांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे नवे बळ मिळाले आहे. नागपुरात माध्यमांशी बोलताना पटोले यांनी भाजपविरोधी धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगत, अशा प्रकारची प्रक्रिया…

Read More

दिरंगाईचा फटका:अकोट-अकोलासह शेगाव काँक्रीट मार्गावर पडल्या भेगा, महिनाभरात दोन बळी, अपघातांचे सत्र वाढल्याने नागरिक संतप्त

अकोट ते अकोल्यासह शेगाव हा परिसरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा काँक्रीट मार्ग सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अलिकडेच उभारण्यात आलेल्या या महामार्गावर अनेक ठिकाणी भल्या मोठ्या व खोल भेगा पडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हा…

Read More

भारतीय नेमबाज जसपाल राणा यांचे 49 व्या वर्षी निधन:एक जून रोजी जर्मनीहून परत येत असताना तब्येत बिघडली होती; कॉमनवेल्थ गेम्समध्ये 9 सुवर्णपदके जिंकली

भारताचे दिग्गज नेमबाज जसपाल राणा यांचे निधन झाले आहे. ते 49 वर्षांचे होते. त्यांना दिल्लीतील मॅक्स साकेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1 जून रोजी रात्री म्युनिकहून परतताना जसपाल यांची विमानात तब्येत बिघडली होती. तिथे त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली होती. मायदेशी परतल्यानंतर जसपाल यांना दिल्लीतील मॅक्स साकेत…

Read More

मेसमध्ये जास्तीचे जेवण घेतले म्हणून 17वर्षीय विद्यार्थ्याला पाइप, बेल्टने मारहाण:छत्रपती संभाजीनगरमधील ‘भारत करिअर अकॅडमी’तील प्रकार‎

पडेगाव येथील ‘भारत करिअर अकॅडमी” या‎ पोलिस भरती अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या एका 17 ‎वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याला मेसमध्ये जास्तीचे ‎जेवण घेतल्याच्या क्षुल्लक कारणावरून रबरी ‎पाइप, बेल्ट व काठीने बेदम मारहाण केल्याची ‎धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‎एवढेच नव्हे, तर क्रूरतेची सीमा ओलांडत ‎विद्यार्थ्याला भिंतीला पाय लावून उलटे उभे‎ राहण्याची अमानुष शिक्षा देण्यात आली.‎ याप्रकरणी क्लासेसचा व्यवस्थापक तथा…

Read More