Headlines

बँकॉकहून मुंबईत आली अन् थेट जेरबंद:11 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा घेऊन आलेल्या बँक मॅनेजर-मॉडेलला अटक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई करत तब्बल 11 कोटी 82 लाख रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात बँकॉकहून मुंबईत आलेल्या 29 वर्षीय हर्षा सनी या तरुणीला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हर्षा सनी ही एका नामांकित खासगी बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून कार्यरत असून ती माजी मॉडेल देखील आहे. त्यामुळे या…

Read More

आरोग्यमंत्र्यांच्या ‘संवाद यात्रे’पूर्वी यंत्रणा झाली सतर्क:जिल्हा शल्य चिकित्सकांकडून मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयाची अचानक करण्यात आली तपासणी‎

राज्याचे आरोग्यमंत्री यांच्या आगामी आरोग्य संवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांनी बुधवारी मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. त्यांनी रु . अकोला येथील शासकीय रुग्णालयात नुकतीच एक खळबळजनक घटना समोर आली होती. या घटनेत एका गरीब महिलेला आपल्या आजारी पतीला पाठीवर घेऊन संपूर्ण…

Read More

'राम मंदिर ट्रस्टमध्ये धर्माचार्य असते तर गडबड झाली नसती':शंकराचार्य म्हणाले- चंपत राय प्रामाणिक नाहीत, दानाचा प्रत्येक पैसा देवाचा आहे

‘राम मंदिराच्या देणग्यांवर सर्वाधिक प्रश्न उपस्थित व्हायला हवेत. देणगीचा प्रत्येक पैसा देवाचा पैसा असतो. सनातन धर्मात देवस्व (चढवा) अत्यंत पवित्र मानले गेले आहे. जर त्या पैशाच्या वापराबाबत प्रश्न असतील, तर उत्तरही मिळायला हवे आणि चौकशीही व्हायला हवी. चंपत राय प्रामाणिक नाहीत. आधीपासूनच एक ट्रस्ट अस्तित्वात होता, ज्यात चार शंकराचार्य, पाच वैष्णवाचार्य आणि 13 आखाड्यांचे प्रमुख…

Read More

श्वान निर्बीजीकरणाचे टेंडर पडून, चारदा निविदा काढूनही कंत्राटदार मिळेना:अकोटमध्ये भटक्या श्वानांची संख्या वाढल्याने नागरिक त्रस्त‎

शहरातील भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी अकोट नगरपरिषदेकडून काढण्यात आलेले श्वान निर्बीजीकरणाचे टेंडर प्रतिसादाअभावी पडून राहिले आहे. संबंधित कामासाठी एकाही कंत्राटदाराने किंवा संस्थेने निविदा दाखल न केल्याने निर्बीजीकरणाची मोहीम रखडली आहे. शहरात भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांकडून श्वानांच्या उपद्रवाबाबत वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी…

Read More

हवामान विभागाकडून इशारा:पुढील 10 तास 15 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचे सावट; महाराष्ट्रात मात्र मान्सून रेंगाळला, शेतकरी चिंतेत

भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील हवामानाबाबत एक अत्यंत मोठी आणि धोक्याची चेतावणी जारी केली आहे. पुढील १० तासांमध्ये देशातील १५ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात ताशी ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, ५ राज्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतात १२ आणि १३ जून रोजी अवकाळी…

Read More

सेन्सेक्स 1000 अंकांनी वाढून 74,800 वर:निफ्टीमध्येही 300 अंकांची वाढ; मेटल आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी

आज म्हणजेच शुक्रवार, 12 जून रोजी सेन्सेक्स 1000 अंकांनी (1.38%) वाढून 74,800 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 300 अंकांची (1.25%) वाढ झाली आहे, तो 23,450 वर पोहोचला आहे. आजच्या व्यवहारात रियल्टी, मेटल आणि बँक शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी झाली आहे. इराण-अमेरिका करारामुळे बाजारात तेजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, इराणचे सर्वोच्च नेते…

Read More

उलगडा; काजल इंगळेचा मारेकरी निघाला तिचा सख्खा मावस भाऊच:30 रुपयांचे पेट्रोल अन् आगपेटीने आरोपी सापडला जाळ्यात‎

तपोवन परिसरातील जंगलात २ जून रोजी जळालेल्या अवस्थेत एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. दोन दिवसांनंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. डीएनए चाचणीच्या आधारे हा मृतदेह काजल जितेंद्र इंगळे (वय २२) या तरुणीचा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर सखोल तपासानंतर गुन्हे शाखेने गुरुवारी (दि. ११) दुपारी काजलच्या मावस भावाला…

Read More

अखिलेश यांच्या मुलीवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी FIR:कानपूर – प्रतापगडमध्ये 4 लोकांवर गुन्हा, म्हणाले- कुटुंबाची प्रतिमा मलिन झाली

सप अध्यक्ष अखिलेश यादव यांची मोठी मुलगी अदिती यादव (23) हिच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुरुवारी कानपूर-प्रतापगडमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. कानपूरमध्ये भारत पटेल, नागेश्वर सिंह बघेल आणि विनोद यादव यांच्यावर, तर प्रतापगडमध्ये शीतला सुजान कवी नावाच्या आयडीवर गुन्हा दाखल करण्यात आला. या लोकांवर सोशल मीडियावर अदिती यादव यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप आहे….

Read More

सोमय्या यांना येण्यास एमआयएमचा विरोध:घोषणाबाजीसह वाहन अडविल्याने उडाला गोंधळ‎

भाजपचे माजी खासदार किरीट ‎‎सोमय्या यांच्या अमरावती‎महापालिका भेटीदरम्यान ‎‎एमआयएमच्या नगरसेवकांनी तीव्र ‎‎आक्षेप घेत जोरदार विरोध केल्याने ‎‎एकच गोंधळ उडाला. सोमय्या यांनी ‎‎परत जावे, अशा घोषणा देत ‎‎एमआयएमचे नगरसेवक‎सोमय्यांचा ताफा अडवण्यासाठी‎पुढे सरसावले. पोलिसांनी‎नगरसेवकांना अक्षरशः ओढत व ‎‎फरफटत नेले. यामुळे काही वेळ‎मनपात तणावाचे वातावरण निर्माण‎झाले होते. दरम्यान, पोलिसांनी‎आंदोलक नगरसेवकांना ताब्यात‎घेत सोमय्यांचा मार्ग मोकळा केला.‎सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या‎तगड्या बंदोबस्तामुळे…

Read More

अंगणवाड्यांना 300 दिवस पोषण आहार द्या:‘टेक होम रेशन’चे बालहक्क संरक्षण आयोगाचे निर्देश : अंमलबजावणी सुरु‎

अंगणवाड्यांमधील बालकांना ३०० दिवस पोषण आहार देणे अनिवार्य असल्यामुळे ‘टेक होम रेशन’ योजना उन्हाळ्यात राबवण्यात आली. यामुळे कडाक्याच्या उन्हात बालकांना अंगणवाड्यांमध्ये येण्याची आवश्यकता नाही. तर त्यांच्या घरीच पोषण आहार पोहोचवण्याची सोय करण्यात आली आहे. राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने अंगणवाड्यांना एक महिना सुटी देण्याचे निर्देश दिले. त्याचवेळी केंद्र शासनाच्या बालकांना ३०० दिवस पोषण आहार देण्याच्या नियमांचे…

Read More