Headlines

काला हिरण चित्रपटाच्या समर्थनार्थ समोर आली सलमानची एक्स गर्लफ्रेंड:निर्मात्याला सांगितले- चित्रपट बनवण्याचा पूर्ण हक्क आहे, फक्त दोषी लोकच धमक्या देतात

‘काला हिरण’ चित्रपटावरून सुरू असलेल्या वादादरम्यान, सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांना पाठिंबा दिला आहे. सलमान खानने कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर अमित जानी यांनी दावा केला आहे की, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या प्रकरणी सोमी अलीने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, अमित जानी यांना कोणत्याही विषयावर चित्रपट बनवण्याचा…

Read More

यशवंत बँक घोटाळा प्रकरण:शेखर चरेगांवकर यांचा जामीन फेटाळला, कराड जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये गाजलेल्या यशवंत बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज आज कराड जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. यामुळे आता शेखर चरेगांवकर यास जामिनासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागणार आहेत. सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या यशवंत बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी शेखर चरेगांवकर यांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती. त्यानंतर…

Read More

मणिपूरमध्ये सशस्त्र हल्लेखोरांचा हल्ला, तीन जणांची हत्या:सात घरेही जाळली, गोळीबार सुरू होताच लोक जंगलात पळाले

मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे झालेल्या हल्ल्यात एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला. सैटू-गामफाजोल उपविभागातील लोइबोल खुल्लेन गावात सकाळी सुमारे चार वाजता शस्त्रधारी हल्लेखोरांनी हल्ला केला. यावेळी सात घरेही जाळण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन गटांमध्ये अनेक मिनिटे गोळीबार झाला. गोळीबार सुरू होताच गावातील लोक जीव वाचवण्यासाठी जवळच्या जंगलात आश्रय घेण्यास भाग पडले. मृत्यू झालेल्यांची…

Read More

शर्तभंग प्रकरणांचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे:नागरिकांना मंत्रालयात जाण्याची गरज नाही, निपटारा स्थानिक पातळीवर

राज्य शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता नियमांतर्गत सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करत शर्तभंग प्रकरणांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, शर्तभंग प्रकरणांच्या निपटाऱ्याचे अधिकार आता विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना बहाल करण्यात आले आहेत. यापूर्वी हे अधिकार केवळ महसूल मंत्र्यांकडे होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली असून, या निर्णयाची अधिसूचनाही जारी करण्यात आली…

Read More

चंद्रपूरच्या 15 गावांच्या सीमांकनासाठी उच्चस्तरीय समिती:दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १५ गावांच्या सीमांकनासाठी राज्य शासनाने अखेर उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या गावांचे महसुली अभिलेख उपलब्ध नाहीत. महसूल व वन विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला आहे. या भागाला मोठा ऐतिहासिक संदर्भ आहे. सन १९५६ पूर्वी आदिलाबाद जिल्ह्यातील राजुरा तालुका…

Read More

काँग्रेसच्या दोन उमेदवारांचे निलंबन:पक्षनेतृत्वाला अंधारात ठेवून अर्ज मागे घेतल्याने कारवाई

विधान परिषद निवडणुकीत पक्षनेतृत्वाला कोणतीही पूर्वकल्पना न देता उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसच्या दोन अधिकृत उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे. यवतमाळचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांना काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या या अनपेक्षित माघारीमुळे विदर्भातील दोन्ही जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय निश्चित झाला. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून काँग्रेसने साहेबराव…

Read More

निदा खानविरोधात आरोपपत्र दाखल:पीडितेचे 'ब्रेनवॉश' करण्यासाठी थेट झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवल्याचे तपासात उघड

नाशिकमधील बहुचर्चित TCS महिला कर्मचारी शोषण आणि धर्मांतर प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिच्याविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. 2022 ते 2026 या चार वर्षांच्या कालावधीत पीडित तरुणीवर झालेल्या अत्याचार आणि मानसिक छळाचा संपूर्ण घटनाक्रम यात मांडण्यात आला आहे. पीडितेचे धर्मांतर…

Read More

सातारा गुन्हेगारी वृत्त:बंद घर फोडून दागिन्यांवर डल्ला, लाखोंची चोरी; घरात घुसून महिलेचा छळ

सातारा शहरातील मोळाचा ओढा परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य करत लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. घरमालक बाहेरगावी असताना चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील मौल्यवान ऐवज लंपास केला. पोलिसांच्या माहितीनुसार, अभिजात फॅक्टरीजवळील एका निवासस्थानी ३१ मे ते ४ जून या कालावधीत ही चोरी झाली. चोरट्यांनी सोन्याच्या…

Read More

महाविकास आघाडीचा विश्वासघात झाला:आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शरद पवार गटाने केला- वसंत मोरे

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधानपरिषदेची निवडणूक अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर बिनविरोध झाली आहे. महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटल्यानंतर, भाजपमधून ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या विक्रम काकडे यांनी निष्ठावंतांना डावलून उमेदवारी मिळवली. यादरम्यान, भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर, तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार…

Read More

शिवसेना शिंदे गटाचे 2 उमेदवार बिनविरोध:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- ही पुढील विजयाची नांदी; मविआवर जोरदार टोलेबाजी

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या दिवशी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद तसेच बंडखोरी देखील पाहायला मिळाली. मात्र, अर्ज माघारीच्या वेळेस अनेकांनी अर्ज मागे घेतले आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील अंतर्गत वाद छत्रपती संभाजीनगर येथे पाहायला मिळाला. मात्र ती जागा भाजपला सोडण्यात आली. त्यानंतर ठाण्यात शिंदे गटाचा उमेदवार…

Read More