साहेब, मी नक्की कुठे चुकलो?:उमेदवारी नाकारल्याने मंत्री जयकुमार गोरेंचे बंधू नाराज, थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून विचारणा
सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता उघडपणे चव्हाट्यावर आली आहे. भारतीय जनता पक्षाने धैर्यशील कदम यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे, या जागेसाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे खटाव-माणचे नेते शेखर गोरे कमालीचे नाराज झाले आहेत. आपली ही तीव्र खंत त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर पत्र लिहून…