विरोधी नेत्यांवर संतापले रामायणातील लक्ष्मण सुनील लहरी:इटलीशी तुलना करून म्हणाले- PMना वाईट-साईट बोलतात, लाजीरवाणी गोष्ट, ओंजळभर पाण्यात बुडून मरा
रामानंद सागर यांच्या लोकप्रिय टीव्ही शो रामायणमध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी भारताच्या राजकारणावर आणि विरोधी नेत्यांवर संतापले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, भारताचे विरोधी नेतेच बाहेरील लोकांशी हातमिळवणी करून देशाच्या प्रतिष्ठेशी खेळतात. त्यांनी भारताला इटलीच्या राजकारणातून शिकण्याचा सल्ला दिला आहे. सुनील लहरी यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यासोबत त्यांनी…