Headlines

कल्याण-डोंबिवलीत 'केडीएमटी'ची बससेवा ठप्प:कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन, पूर्वकल्पनेविना पगारात कपात केल्याचा आरोप

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेचे ब्रीदवाक्य ‘सेवेशी तत्पर’ असे असले तरी, आज ही सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. कंत्राटदाराने कोणतीही पूर्वकल्पना न देता पगारातून रक्कम कपात केल्याचा आरोप करत कंत्राटी चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी अचानक बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. या संपामुळे केडीएमटी डेपोतून एकही बस रस्त्यावर न उतरल्याने ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे प्रचंड हाल…

Read More

सपा म्हणाली- डिंपल यादव यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले:कॉकरोच पार्टीच्या आंदोलनात पोहोचल्या होत्या; लखनौमध्ये पोलिसांनी सपा कार्यकर्त्यांना फरफटत नेले

समाजवादी पक्षाने सोमवारी दावा केला की, दिल्ली पोलिसांनी खासदार डिंपल यादव यांना ताब्यात घेतले आहे. डिंपल, इकरा हसन आणि प्रिया सरोज पक्षाच्या इतर खासदारांसोबत ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या समर्थनार्थ संसदेपासून जंतर-मंतरपर्यंत पायी मोर्चा काढत होत्या. सपाने ‘X’ वर लिहिले – दिल्लीत विद्यार्थ्यांचा आवाज उठवणाऱ्या डिंपल यादव आणि सपाच्या इतर खासदारांना ताब्यात घेणे, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे अत्यंत…

Read More

महिला SRPF भरती रखडली, समितीकडून सरकारला सवाल:आगामी भरतीत महिलांना संधी देण्याची विद्यार्थी समन्वय समितीची मागणी

राज्य राखीव पोलिस दलातील (एसआरपीएफ) महिलांची रखडलेली भरती नेमकी कधी होणार, असा प्रश्न विद्यार्थी समन्वय समितीने राज्य सरकारला विचारला आहे. आगामी पोलिस भरतीमध्ये महिलांना एसआरपीएफमध्ये सामावून घेण्याची मागणीही समितीने केली आहे. राज्य सरकारने 7 जुलै 2020 रोजी एसआरपीएफमध्ये महिलांचा स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. या गटाला तत्त्वतः मंजुरी देण्यात आली होती. नागपूरमधील काटोल…

Read More

कैद्याच्या नियमित झडतीत गांजा सापडला:येरवडा कारागृहात अमली पदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाखल

न्यायालयीन कामकाजासाठी कारागृहाबाहेर गेलेला एक कैदी परत येत असताना त्याच्याकडे गांजा सापडला. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी कैद्याविरुद्ध अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. निहालसिंग मुन्नासिंग टाक (वय 21, रा. हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या कैद्याचे नाव आहे. कारागृहातील रक्षक समाधान हत्तीकर यांनी याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निहालसिंग हा…

Read More

ज्येष्ठ गांधीवादी डॉ. कुमार सप्तर्षी अनंतात विलीन:पुणे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पडले पार, मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते आणि माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. सोमवारी सकाळी ९:३० ते १२:१५ या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कोथरूड येथील गांधीभवन येथे ठेवण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक आणि समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी डॉ. सप्तर्षी यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या रथातून डॉ. सप्तर्षी…

Read More

देहरादूनमध्ये कॅफेबाहेर गोळीबार:मित्राने फोन करून बोलावले, मग पीजी संचालकावर गोळ्या झाडल्या; वाचवण्यासाठी आलेल्या लोकांना पाहून आरोपी पळून गेले

देहरादूनमधील कॅफेबाहेर गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना पटेलनगर येथील आहे, येथून काही अंतरावर दून मेडिकल कॉलेज होते. गोळीबाराचा आवाज ऐकून तरुणाचे मित्र त्याला वाचवण्यासाठी पोहोचले आणि तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर पीडितेने पटेलनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन कारवाईची मागणी केली. पोलिसांनी हत्येचा प्रयत्न आणि जाणूनबुजून शांतता भंग करण्याच्या उद्देशाने चिथावणी दिल्याचा गुन्हा…

Read More

येरवडा कारागृहात बंदी बांधवांकडून गणेशमूर्तींची निर्मिती:'प्रेरणापथ' प्रकल्पांतर्गत कैद्यांना मिळाले कलात्मकतेचे व्यासपीठ; समाजप्रवाहात आणण्याचा उद्देश

येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदी बांधवांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. आयुष्याच्या एका वळणावर घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगणाऱ्या या कैद्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि कलात्मकता निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यशाळेमुळे त्यांच्या नव्या आयुष्याचा ‘श्रीगणेशा’ झाला आहे. महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान-पुणे आणि आदर्श मित्र मंडळ-पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गेली बारा…

Read More

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे 'संतवाणी' कार्यक्रमाचे आयोजन:24 जुलै रोजी भरत नाट्य मंदिरात चार गायक सादर करणार अभंग

शास्त्रीय संगीत आणि संतपरंपरेचा वारसा जपणाऱ्या आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे ‘संतवाणी’ या विशेष भक्तिसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, 24 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता पुणे येथील भरत नाट्य मंदिरात होणार आहे. या कार्यक्रमात संतांच्या अभंगवाणीला स्वरसाज चढवण्यासाठी चार प्रसिद्ध गायक एकाच मंचावर येणार आहेत. विराज जोशी, पं. उपेंद्र भट, सावनी…

Read More

पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यातून आरोपी पसार:19 वर्षीय वैभव खोत बेडीतून हात काढून फरार

पुण्यात बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या तपास कक्षातून अटक केलेला एक आरोपी पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वैभव अनिल खोत (वय १९, रा. श्रमिकनगर, टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. खोत याला एका गुन्ह्यात १९ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्याला तपास पथकाच्या कक्षात…

Read More

त्रिपुरा DGP कार्यालयात मृत आढळले, आत्महत्येची शक्यता:1994 च्या बॅचचे IPS, उत्तर प्रदेशचे रहिवासी होते; 1984 च्या शीखविरोधी दंगलींची चौकशी केली होती

उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले त्रिपुराचे डीजीपी अनुराग धनखड यांचा मृतदेह आढळला आहे. सोमवारी सकाळी ते पोलीस मुख्यालयात बेशुद्ध अवस्थेत आढळले. अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अनुराग धनखड यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेह सध्या अगरतला येथील गोविंद वल्लभ पंत रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक…

Read More