पालघरमध्ये थरारक दरोडा:भरदिवसा बंदुकीच्या धाकावर सराफा दुकान लुटले; सोने पोत्यात भरून चोरटे पसार; VIDEO
पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या इराणी नगर परिसरातील ‘लक्ष्मी ज्वेलर्स’ या सोन्याच्या दुकानावर तीन अज्ञात दरोडेखोरांनी भरदिवसा बंदुकीच्या धाकावर धाडसी दरोडा टाकला. हातात शस्त्र घेऊन आलेल्या या टोळीने दुकानातील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने गोळा करून एका पोत्यात भरले आणि घटनास्थळावरून पळ काढला. गजबजलेल्या भागात आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे डहाणूसह संपूर्ण परिसरातील सराफा व्यावसायिकांमध्ये तीव्र भीतीचे…