संभाजीनगरमधील शेंद्रा-बिडकीन-ढोरेगाव ग्रीनफील्ड रस्त्यासाठी १० दिवसांत निविदा:महामार्ग थेट एमआयडीसीला जोडला जाणार असल्याने प्रवासाचा दीड तास वाचणार
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पायाभूत सुविधांना गती देणाऱ्या शेंद्रा-बिडकीन ते ढोरेगाव या सुमारे ६७.८० किलोमीटरच्या नव्या ग्रीनफील्ड रस्ते प्रकल्पाचे राजपत्र प्रसिद्ध झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाला ‘राज्य महामार्ग क्रमांक ६१३’ म्हणून अधिसूचित केले. येत्या १० दिवसांत या प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध होईल. या रस्त्याचे काम १०० टक्के पूर्ण झाल्यावर छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा, खान्देशातील प्रवाशांची ढोरेगावमार्गे पुण्याला…