Headlines

Thieves break into 4 shops in Nagad in one night

. नागद येथील बसस्थानक परिसरातील बाजारपेठेत अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री चार दुकाने फोडून ४० हजार रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शुक्रवारी रात्री १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी कुलपे न तोडता कटरने कडीकोयंडे कापून चोरी केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक नारायण गीते यांनी दिली. या चोरीत योगेश तायडे यांच्या देशी दारूच्या दुकानातून…

Read More

कारवाई:कोर्टाच्या तारखेला गैरहजर राहणाऱ्या 27 जणांवर गंगापूर पोलिसांची धडक कारवाई

गंगापूर विविध प्रकरणांमध्ये न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या तारखेला वारंवार गैरहजर राहणाऱ्या आरोपींविरोधात गंगापूर पोलिसांनी मोहीम राबविली आहे. पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विशेष मोहीम आखून ३५ न्यायालयीन वॉरंटपैकी २७ व्यक्तींना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे. गंगापूर तसेच छत्रपती संभाजीनगर येथील न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या विविध खटल्यांमध्ये हजर राहण्याचे आदेश असतानाही संबंधित आरोपी सतत…

Read More

फुलंब्रीत तहसीलमध्ये जनता दरबार:समस्या सोडवण्यात हलगर्जी केल्यास कारवाई, आमदार अनुराधा चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिला इशारा‎

सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न वेळेत सुटलेच पाहिजेत. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात किंवा नागरिकांच्या समस्या सोडवण्यात जर कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने हलगर्जीपणा केला, तर त्यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा थेट इशारा आमदार अनुराधा चव्हाण यांनी दिला आहे. फुलंब्री तहसील कार्यालयात नागरिकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी विविध शासकीय विभागांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते,…

Read More

SC म्हणाले- प्रवाशांना सेकंड क्लास म्हणणे चुकीचे:हा शब्द रेल्वे कोचसाठी; रेल्वे अपघातातील पीडिताला 10 वर्षांनंतर ₹8 लाखांची भरपाई

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सांगितले की, कोणत्याही प्रवाशाची श्रेणी त्याच्या खर्चावरून ठरवू नये. रेल्वेच्या नियमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘सेकंड क्लास पॅसेंजर’ या शब्दावर आक्षेप घेत न्यायालयाने म्हटले की, ‘सेकंड क्लास’चा संबंध डब्याशी असावा, प्रवाशाशी नाही. न्यायालयाने मध्य प्रदेश उच्च न्यायालय आणि रेल्वे दावे न्यायाधिकरणाचा (रेल्वे क्लेम्स ट्रिब्यूनल) निर्णय रद्द करत रेल्वे अपघातात जीव गमावलेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबाला…

Read More

पैठण येथे पोलिसांचे रस्ता सुरक्षा अभियान:जनजागृतीचे शहरभर कौतुक

पैठण शहरातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि वाहतूक नियमांबद्दल नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी १५ जुलै रोजी पैठण पोलिस प्रशासनाच्या वतीने एक विशेष रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले. डीवायएसपी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पवार, पीएसआय सारंग, हेड कॉन्स्टेबल चेडे, ढाकणे, पोलिस कॉन्स्टेबल शिंदे, दुबाले, पठाण, भोजने व खिळे यांनी दुपारी ३ ते ६ या वेळेत…

Read More

गौरव:ढाकेफळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा जिल्हा पातळीवर गौरव

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त पैठण तालुक्यातील ढाकेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेच्या वतीने गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य व शिक्षण समिती सभापती यांच्या हस्ते मंगळवारी वेरूळ सभागृहात आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र ढाकेफळ येथे सन २०२५-२६ या वर्षात जिल्हा व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

20 लाख रुपयांसाठी छळ:5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, नोकरी लावण्यासाठी माहेरहून पैशांची मागणी‎

पतीला नोकरी लावण्यासाठी माहेराहून २० लाख आणण्याची मागणी करत २६ वर्षीय विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. प्रियंका उर्फ लता नितेश सागरे (रा. रजाळवाडी) यांचा विवाह २०२३ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील नितेश सागरे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी पतीला नोकरी लावण्यासाठी माहेराहून २० लाख आणण्याचा…

Read More

MPत 9 दिवसांनंतर मान्सून पुन्हा सक्रिय:यूपीच्या 87 गावांना पुराचा धोका; अरुणाचल प्रदेशात पूर-भूस्खलनाची स्थिती

मध्य प्रदेशमध्ये 9 दिवसांनंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. शुक्रवारी बालाघाट, उमरिया आणि डिंडोरीमध्ये जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने बालाघाट आणि डिंडोरीमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे, तर 31 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. छत्तीसगडमध्येही मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. हवामान विभागाच्या मते, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यात पुढील 3…

Read More

अमरकंद वनस्पतीची तस्करी करणाऱ्या ‎सिल्लोडमधील तिघांना अटक:5 किलो कंद आणि दोन दुचाकी जप्त

सिल्लोड तालुक्यातील केळगाव परिसरातील डोंगराळ भागातून अत्यंत दुर्मिळ आणि औषधी मानल्या जाणाऱ्या अमरकंद वनस्पतीची बेकायदेशीरपणे तस्करी करणाऱ्या तिघांना वनविभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. गुरुवारी झालेल्या या कारवाईत संशयितांकडून ५ किलो अमरकंद आणि दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. घटांब्री येथील नासेर यासीन पठाण (२९), वाजेद जुम्मा पठाण (३१) आणि शारूख मुस्तफा शेख (३०) अशी…

Read More

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक:19.50 कोटींच्या थकीत ऊस बिलासाठी पैठणला जलकुंभावर 13 तास आंदोलन

तालुक्यातील संत एकनाथ-सचिन घायाळ शुगर इंडस्ट्रीज यांनी २०२५-२६ च्या गाळप हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची १९ कोटी ५० लाखांची एफआरपी थकविल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, पवन शिसोदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी ६ वाजेपासून पैठण तहसील कार्यालयासमोरील पाण्याच्या टाकीवर चढून १३ तास आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी महसूल प्रशासनाने कारखान्याची जप्ती व लिलाव…

Read More