महिला PSIला 3 लाखांची लाच घेताना पोलिस ठाण्यातच रंगेहाथ पकडले:गुन्ह्याची बी-फायल पाठवण्यासाठी मागितले पैसे, पुण्याच्या दिघी पोलिस ठाण्यात एसीबीची कारवाई
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या दिघी पोलिस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस उपनिरीक्षक (PSI) चेताली गणपत गापट (वय 35) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई दिघी पोलिस ठाण्यातच करण्यात आली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता आणि त्याच्या तपासाची जबाबदारी पीएसआय चेताली गापट यांच्याकडे होती….