पालांदूर जि.प. शाळेत 93 विद्यार्थ्यांना एकच शिक्षक:संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकून शिक्षण विभागाचा निषेध केला
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पालांदूर (चौ.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ९३ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे. या परिस्थितीमुळे संतप्त ग्रामस्थ आणि पालकांनी मंगळवारी, १४ जुलै रोजी शाळेच्या मुख्य गेटला कुलूप ठोकून शिक्षण विभागाचा निषेध केला. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या या शाळेत एकूण ९३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये पहिलीत २०, दुसरी २५,…