Headlines

नाशिकच्या सावळा घाटात भीषण अपघात:ब्रेक फेल झाल्याने भरधाव ट्रकची कारला धडक, 4 जणांचा मृत्यू; एक जखमी

नाशिकच्या सावळा घाटात मंगळवारी सायंकाळी अत्यंत भीषण अपघात घडला. एका भरधाव ट्रकचे ब्रेक अचानक फेल झाल्याने तो थेट पुढच्या इको कारवर जाऊन आदळला. या जोरदार धडकेमुळे ती कार आणखी एका पुढच्या ट्रकमध्ये घुसली आणि दोन मोठ्या वाहनांच्या मध्ये या कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या दुर्दैवी घटनेत कारमधील चार जणांचा मृत्यू झाला आहे. उतारावर घडला अनर्थ…

Read More

राम मंदिरात 14 हजार कोटींची लूट:संजय राऊतांचा आरोप, देवेंद्र फडणवीसांनाही लगावला टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिर प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. रामरक्षा म्हणणाऱ्यांनीच राम मंदिरातील साडेपाचशे कोटींची दानपेटी फोडून १४ हजार कोटी लुटले, असा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी आधी या चोरांवर कारवाई करावी, अशी मागणी राऊत यांनी १४ जुलै रोजी नागपुरात माध्यमांशी बोलताना केली. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर आणि केदारनाथ-बद्रीनाथमधील…

Read More

अहिल्यानगरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीत अपघात:पिकअपच्या धडकेत वारकरी गंभीर जखमी, चालक फरार

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यावर आज सकाळी एक मोठे संकट ओढवले. नगर-सोलापूर महामार्गावरील रुईछत्तीशी शिवारात रस्ता ओलांडणाऱ्या एका वारकऱ्याला भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वारकरी गंभीर जखमी झाला असून, घटनेनंतर चालक गाडी तिथेच सोडून पळून गेला आहे. 2 दिवसांपूर्वीच पुण्यात सासवडजवळ अशाच एका अपघातात ट्रकने वारकरी महिलांना चिरडले होते. रस्ता ओलांडताना काळाचा…

Read More

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना जाहीर:गुणवंत विद्यार्थ्यांकडून 24 जुलैपर्यंत अर्ज मागवले

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, अमरावती यांनी जिल्ह्यातील मातंग समाज आणि तत्सम बारा पोटजातींमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ही योजना असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २४ जुलै आहे. या योजनेंतर्गत इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर तसेच वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये सरासरी ६०…

Read More

मुंबईतील 3 नामांकित हॉटेलांवर FDA ची कारवाई:अन्नसुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याने परवाने निलंबित

हॉटेलमध्ये जाऊन जेवणाऱ्या खवय्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील भेंडीबाजार आणि उमरखाडी परिसरातील 3 अत्यंत नामांकित हॉटेल्सचे परवाने थेट निलंबित केले आहेत. स्वयंपाकघरातील अस्वच्छता, कीटकांचा वावर आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. कोणत्या हॉटेल्सवर झाली कारवाई? FDA चे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी…

Read More

पीएमआरडीएने मोई येथे 35 हेक्टर क्षेत्र अतिक्रमणमुक्त केले:680 अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त; 1000 अधिकारी-कर्मचाऱ्यांसह 20 तास कारवाई

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) खेड तालुक्यातील मोई येथे १३ व १४ जुलै २०२६ रोजी अनधिकृत बांधकामांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली. सलग २० तास चाललेल्या या मोहिमेत सुमारे ३५ हेक्टर क्षेत्रावरील ६८० अनधिकृत पत्राशेड आणि व्यावसायिक बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त…

Read More

यूपीच्या राज्यपाल म्हणाल्या- 13 वर्षांच्या मुलींना वाचवा:याच वयात मासिक पाळी सुरू होते, खरे प्रेम असेल तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्नापासून दूर राहा

यूपीच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मंगळवारी सांगितले- मी काही बोलले की ते व्हायरल होते. माझ्या बोलण्याचा उद्देश चुकीचा नसतो. तुम्हाला सर्वोत्तम बनवणे हे माझे ध्येय आहे. 13 वर्षांच्या मुलींना वाचवा, त्यांच्याकडे लक्ष द्या. याच वयात मासिक पाळी (पीरियड्स) सुरू होते. या वयाच्या मुलींची तपासणी नक्कीच व्हायला पाहिजे. त्यांना वेळेवर उपचार मिळावेत. राज्यपाल लखनऊमधील संजय गांधी…

Read More

मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या दिंड्यांना 2.80 कोटींचे अनुदान मंजूर:मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत प्रति दिंडी 20 हजार वाटप सुरू

मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार रुपये याप्रमाणे एकूण २ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त पुणे तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्या देखरेखीखाली या निधीचे थेट बँक खात्यात वाटप सुरू झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत नव्याने स्थापन झालेल्या ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळा’ने…

Read More

Aamir Khan Marriage Controversy | Aligarh Mufti Issues Fatwa

अलीगढ11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक चित्रपट अभिनेता आमिर खान यांच्या तिसऱ्या लग्नावरून यूपीमध्ये फतवा जारी करण्यात आला आहे. हा फतवा अलीगढमध्ये यूपीचे शाही चीफ मुफ्ती मौलाना चौधरी इफ्राहीम हुसैन यांनी मंगळवारी दुपारी सुमारे 1 वाजता जारी केला. मुफ्ती म्हणाले- शरीयत (इस्लामचे नियम) नुसार, कोणत्याही मुस्लिम पुरुषाने अशा गैर-मुस्लिम महिलेशी लग्न करणे पूर्णपणे चुकीचे आणि अवैध आहे,…

Read More

ई-20 पेट्रोल सक्तीविरोधात 'आप'चा गडकरींच्या घरावर मोर्चा:जुन्या वाहनांसाठी धोकादायक असल्याचा पक्षाचा आरोप

आम आदमी पार्टीच्या (आप) नागपूर शहर शाखेने आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर ई-२० (२० टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोलच्या कथित सक्तीविरोधात निषेध मोर्चा काढला. गांधीगेट, महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा पोलिसांनी अडवला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक, वाहनधारक, युवक, महिला आणि पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. प्रदेश संघटन मंत्री…

Read More