Headlines

केंद्रात दोन, राज्यामध्ये एका कॅबिनेट मंत्रिपदासाठी शिंदे यांची दिल्ली वारी:इकडे फडणवीसांसोबत वर्षावर जयंत पाटील, तटकरे, पटेलांची बैठक

‘ऑपरेशन टायगर’ राबवून उद्धवसेनेचे सहा खासदार फोडल्यामुळे केंद्रीय स्तरावर शिवसेनेचे (शिंदे गट) वजन वाढवण्याची तयारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. सूत्रांनी सांगितले की, या तयारीचाच एक भाग म्हणून त्यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर आपल्या नंदनवन या शासकीय बंगल्यावर शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी केंद्रात आणखी दोन मंत्रिपदे तसेच राज्यात एका कॅबिनेट मंत्रिपदावर दावा केला…

Read More

जिल्हा सहकारी बँकेत निवडून आलेले 3नवे संचालक भाजपच्या तंबूत दाखल:अध्यक्षपद मिळवण्यासाठी शिंदेसेना, भाजपमध्ये रस्सीखेच सुरू

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने २० पैकी १८ जागा जिंकल्या असून उबाठाचे आमदार अंबादास दानवे यांनीही महायुतीच्या पॅनलमधून विजय संपादन केला. २० पैकी १९ सदस्य महायुती पॅनलचे असल्याने बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष महायुतीचे होणार यात दुमत नाही. अध्यक्षपदी मिळवण्याच्या तयारीत असलेल्या भाजपला ३ सदस्य आपल्याकडे खेचण्यात यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आणि अपक्ष…

Read More

सरकारी अहवालात सरकारलाच घरचा आहेर:96 हजार कोटी खर्च, तरी दीड वर्षाच्या 10 विमान अपघातांत 284 प्रवासी ठार, सुरक्षेशी खेळणाऱ्या 37 कंपन्यांना ठोठावला दंड

मागील दशकात विमानतळांच्या पायाभूत सुविधांवर ९६ हजार कोटींचा खर्च झाला. तरी अ‌वघ्या दीड वर्षात झालेल्या १० अपघातांत २८४ प्रवासी ठार झाले आहेत. यामुळेच डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने (डीजीसीए) सुरक्षा नियमांचे उल्लंघन, देखभालीतील त्रुटी अन् बेफिक . केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाच्या २०२५ च्या वार्षिक अहवालातून या बाबी समोर आल्या आहेत. ‘डीजीसीए’ने वर्षभरात केलेल्या ९७५ सुरक्षा…

Read More

दिव्य मराठी मुलाखत:चंपत राय-मिश्रांनी हलगर्जीपणा केला, मात्र श्रीराम मंदिरातील घोटाळ्यास ‘एसबीआय’च जबाबदार- गोविंदगिरी महाराज

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील कथित चोरी, अपहार प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. या वादाच्या केंद्रस्थानी असलेले श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले की, ही घटना म्हणजे श्रीरामचरणी केलेले महापाप आहे. या प्रकरणात चंपत राय, मिश्रांनी हलगर्जीपणा केला. पण या घोटाळ्याला एसीबीआयच (स्टेट बँक ऑफ इंडिया) जबाबदार आहे….

Read More

Preparations to return donations, items of those accused of stealing donations can be returned after investigation

Marathi News National Ram Mandir: Preparations To Return Donations, Items Of Those Accused Of Stealing Donations Can Be Returned After Investigation अभिनव आनंद सिंग | अयोध्या9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्या येथील राम मंदिरातील देणगी वादाच्या पार्श्वभूमीवर, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट आता दान केलेल्या वस्तूंच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या भक्तांच्या अर्पण केलेल्या वस्तू परत करण्याची तयारी…

Read More

तिघांचा जामीन फेटाळला:सोलापुरात पकडलेल्या आरोपींच्या मोबाइलमध्ये 50 पाकिस्तानी नंबर, देशविघातक कृत्यांसाठी 10 कोटींचा अपहार

आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी थेट संबंध असल्याच्या संशयावरून आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापुरातील एका स्वयंसेवी संस्थेच्या (एनजीओ) तीन पदाधिकाऱ्यांचे जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. मुंबई दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून, आरोपींचे पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांशी थेट संपर्क असल्याचे तपासात उघड झाले आहे. मुंबई एटीएसने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करून सोमवारी न्यायालयात…

Read More

पाक गँगस्टर भट्टीच्या संपर्कात असल्याचा संशय:पुण्यामधील 66 तरुणांची एटीएसकडून कसून चौकशी

पाकिस्तानातून दहशतवादी कारवाया चालवणारा गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याच्या टोळीच्या संपर्कात असलेल्या पुणे जिल्ह्यातील ६६ जणांची राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी सखोल चौकशी केली. भट्टी हा सोशल मीडियाचा वापर करून तरुणांची माथी भडकवून देशविघातक कारवायांमध्ये ओढत असल्याची धक्कादायक माहिती मिळाल्यानंतर ही व्यापक कारवाई करण्यात आली आहे. एटीएसने मंगळवारी सकाळी ७ वाजेपासून पुणे शहर, पुणे ग्रामीण…

Read More

राज्यातील धरणांत 44% पाणी, मराठवाड्यात सर्वात कमी 25%:धरणांतील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा 15% घटला

ऐन पावसाळ्यात पावसाने ओढ दिल्याने राज्यातील धरणसाठ्यात चिंताजनक घट झाली आहे. जलसंपदा विभागाने १४ जुलै रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, राज्यातील ३०२९ प्रकल्पांमध्ये सध्या केवळ ४३.९३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ५९.४३ टक्के होता. म्हणजेच एका वर्षात पाणीसाठ्यात जवळपास १५.५० टक्क्यांची घट झाली असून, मराठवाड्याची स्थिती सर्वाधिक गंभीर आहे. राज्यातील…

Read More

आग्रामध्ये परदेशी महिला पर्यटकाची साडी सुटली:महिला शिपायाने साडी नेसण्यास मदत केली, अर्जेंटिनाच्या पर्यटकाने म्हटले- थँक्यू, यूपी पोलिस

आग्रा येथे साडी नेसून ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या अर्जेंटिनाच्या महिला पर्यटकाची साडी सुटली. ती वारंवार साडी नेसत होती, पण साडी सुटत होती. यामुळे पर्यटक थोडी अस्वस्थ झाली. हे पाहून सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महिला शिपायाने तिची साडी नेसण्यास मदत केली. हे पाहून पर्यटक खूप आनंदी झाली आणि तिने साडी नेसण्याची आणि निऱ्या (प्लेट्स) करण्याची पद्धत विचारली. शिपायाने…

Read More

एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट, 45 मिनिटे बैठक:विकासकामांसाठी निधीचे आश्वासन, उद्या शिंदेंची पत्रकार परिषद

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे गटाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांनी आज थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत खासदारांच्या मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे आणि केंद्राच्या निधीबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी अमित शाहांनी या सर्व खासदारांना विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही,…

Read More