Headlines

नाशिक, परभणी, बीडसह उर्वरित राज्याला ‘यलो अलर्ट’:विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाचा जोर राहणार, संभाजीनगरसह 14 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने गुरुवारी (३० जुलै) राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ तर उर्वरित जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. यामुळे बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ऑरेंज अलर्ट: रायगड, जळगाव, पुणे, कोल्हापूर, सातारा घाटक्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, भंडारदरा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व वर्धा. यलो अलर्ट : पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे,…

Read More

सिल्लोडमधील रस्त्यावर तरुणाचा ‎गळा चिरलेला मृतदेह आढळला:कारण अस्पष्ट, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल‎

शहरातील भोकरदन रोडवरील एकता‎पेट्रोल पंपाच्या पाठीमागील‎नगरपरिषदेच्या पाणीटाकीजवळ‎बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास‎एका ३० ते ३५ वर्षीय अज्ञात तरुणाचा‎गळा शस्त्राने चिरून खून केल्याची‎घटना उघडकीस आली आहे.मृताची‎ओळख अद्याप पटलेली नाही.‎ मृतदेह कुजलेल्या अवस्थेत‎आढळून आल्याने, खुनानंतर पुरावे‎नष्ट करण्याच्या उद्देशाने तो या निर्जन‎स्थळी फेकून दिल्याचा संशय व्यक्त‎होत आहे. डायल ११२ वर मिळालेल्या‎माहितीवरून पोलिस कर्मचारी‎सलीमपाशा चांदपाशा मोमीन यांनी‎तातडीने घटनास्थळी धाव घेतली….

Read More

बिडकीनला वापर सुरू होण्यापूर्वीच नवा पूल खचला‎:महामार्ग प्राधिकरणाने संभाजीनगरच्या नवीन जलवाहिनीवर फोडले खापर, पाणीपुरवठा विस्कळीत‎

छत्रपती संभाजीनगर ते पैठण या महामार्गाचे‎काम कोट्यवधी रुपये खर्च करून संथगतीने‎सुरू असल्याचा आरोप होत असतानाच,‎बिडकीन येथील साई मंदिरासमोरील नव्याने‎बांधलेल्या पुलाच्या बाजूचा रस्ता आणि‎सिमेंटचा मोठा भराव बुधवारी अचानक‎खचला. आधी हळूहळू माती सरकली आणि‎नंतर भराव खाली कोसळला. हे दृश्य‎नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केले असून त्याचे‎व्हिडिओ मीडियावर व्हायरल होत आहेत.‎ याबाबत नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ‎इंडियाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला‎असता, त्यांनी…

Read More

कोल ब्लॉक: दिवंगत मनमोहन सिंग यांना मिळाली क्लीन चीट:तलबीरा-2 प्रकरणात क्लोजर रिपोर्ट मंजूर

सुप्रीम कोर्टाने ११ वर्षे जुन्या तलबीरा-२ कोल ब्लॉक वाटप प्रकरणात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना क्लीन चिट देत त्यांच्याविरुद्ध जारी समन्स रद्द केले. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने बुधवारी सीबीआयचे दोन्ही क्लोजर रिपोर्ट स्वीकारले. न्यायालयाने म्हटले की, ट्रायल कोर्टाकडे क्लोजर रिपोर्ट फेटाळण्याचे कोणतेही कारण नव्हते. खंडपीठाने म्हटले, डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे अपील निष्प्रभावी…

Read More

रोजगार निर्माण करणारे उद्योजक बना:डॉ. चंद्रकांत शिंदे यांचे श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

अमरावती येथील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित करिअर संसद शपथविधी सोहळ्यात श्री संकल्प मीडिया सोल्युशनचे संचालक डॉ. चंद्रकांत शिंदे यांनी विद्यार्थ्यांना रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनण्याचे आवाहन केले. त्यांनी पदवी घेऊन न थांबता स्वतःच्या कल्पना, कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर उद्योजक बनण्याचा प्रेरणादायी संदेश दिला. महाविद्यालयाच्या सर सी.व्ही. रमण सभागृहात ‘करिअर संसद शपथविधी आणि यशस्वी उद्योजकांशी…

Read More

अमरावती सुपर स्पेशालिटीत दुर्मिळ अन्ननलिका कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया:डॉ. अतुल यादगिरे यांच्या नेतृत्वाखाली 40 वर्षीय महिलेवर उपचार

अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे अन्ननलिकेच्या दुर्मिळ कर्करोगाने ग्रस्त असलेल्या ४० वर्षीय महिलेवर यशस्वी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील रहिवासी असलेल्या या महिलेला कर्करोग तज्ज्ञ डॉ. अतुल यादगिरे आणि त्यांच्या चमूने जीवनदान दिले. रुग्णाला अन्न गिळताना आणि पाणी पितानाही तीव्र त्रास होत होता. अन्ननलिकेत अडथळा निर्माण झाल्याने तिच्या…

Read More

राष्ट्रसंतांच्या महासमाधीस्थळी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा:हजारो भाविकांची उपस्थिती, स्मृतींना उजाळा

मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस्थळी गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात पार पडला. या महोत्सवाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर तीर्थस्थापना आणि सामुदायिक ध्यानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रसंतांची महासमाधी रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाली होती. पहाटे चार वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचा अभिषेक करण्यात आला. गुरुदेवप्रेमींनी गुरुमाऊलीला आदरांजली वाहताना विविध भजने गायली. शंखनाद आणि…

Read More

525 NHM कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी:यादी जाहीर; हरकती नोंदवण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत, 7 ऑगस्ट रोजी अंतिम यादी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील ५२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. १० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या या कर्मचाऱ्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीतील संभाव्य तांत्रिक चुकांवर हरकती नोंदवण्यासाठी संबंधित उमेदवारांना ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्राप्त हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी…

Read More

कोयना धरणाच्या जलाशयाचे नामांतर:आता "छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' नावाने ओळखले जाणार, राज्य सरकारचा निर्णय

पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कोयना जलसागराला आता ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ या नावाने ओळखले जाणार आहे. राज्य सरकारने कोयना जलसागराच्या नामांतराचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, यासंदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. कोयना जलसागराचे नामांतर करण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार…

Read More

दर्यापूरच्या प्राध्यापकाने गोवऱ्या बनवण्याचे यंत्र बनवले:या अभिनव संशोधनाला भारत सरकारकडून मिळाले पेटंट

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील माहुली (धांडे) येथील गाडगेबाबा गोरक्षण संस्थेचे संस्थापक प्राध्यापक गजानन भारसाकळे यांनी गोवऱ्या बनवण्याचे अभिनव यंत्र तयार केले आहे. त्यांच्या या संशोधनाला भारत सरकारकडून पेटंटही मिळाले आहे. या यशामुळे ग्रामीण भागातील एका महत्त्वाच्या कामाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. या संशोधनाचे नाव “गाईच्या शेणापासून गोवरी उत्पादनास्तव आयओटी बेस मशीन निर्मिती” असे आहे….

Read More