अवघ्या 5 मिनिटांत विद्यार्थ्यांनी सोडवली अवघड गणिते!:अहिल्यानगरमध्ये राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
विद्यार्थ्यांमध्ये गणिताची भीती दूर करून त्यांना झटपट व अचूक गणित सोडविण्याची क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने इन्स्पायर अबॅकस अँड वेदिक मॅथ अकॅडमी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. सुखकर्ता लॉन येथे झालेल्या या स्पर्धेत राज्यासह देशभरातील ८७७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अकॅडमीच्या संचालिका अर्चना शेळके, सत्यशिला भद्रे आणि दादासाहेब शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित स्पर्धेत विद्यार्थ्यांनी…