Headlines

दर्जेदार ऊसाचा वाण दिल्यास गा‌ळपात शेतकऱ्यांना लाभ:चेअरमन शिवाजीराव सावंत यांनी दिली माहिती‎

राजवी ॲग्रो पॉवर प्रा.लि. आलेगाव बु. (ता. माढा) येथे गळीत हंगाम २०२६-२७ च्या शुभारंभानिमित्त रोलर पूजन सोहळा संपन्न झाला. कारखान्याचे व्हाईस चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांच्या शुभहस्ते रोलरचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव सावंत होते. यावेळी बोलताना अध्यक्ष शिवाजीराव सावंत म्हणाले, “शेतकऱ्यांनी दर्जेदार ऊस दिल्यास कारखान्याला चांगले गाळप…

Read More

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा 8वा दिवस:पेपर लीक सुधारणा विधेयकावर आज लोकसभेत मतदान; राज्यसभेतही सादर होणार विधेयक

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज आठवा दिवस आहे. मंगळवारी लोकसभेत पेपरफुटीशी संबंधित ‘पब्लिक एक्झामिनेशन (अयोग्य साधनांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ वर दुपारी 2 ते रात्री 11 वाजेपर्यंत 9 तास चर्चा झाली. रात्री 11 वाजता लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. आज लोकसभेत विधेयकावर मतदान होईल आणि राज्यसभेत विधेयक मांडून त्यावर चर्चा केली जाईल. या विधेयकात 2024 मध्ये…

Read More

उजनी, वीरच्या विसर्गाचा "संगम''; चंद्रभागा दुथडी‎, उजनीची पातळी नियंत्रणासाठी 61,600 क्यूसेक भीमेत तर वीरमधून नीरा नदीत 5737 क्यूसेकने विसर्ग सुरू‎

उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोडण्यात आलेला ६१,६०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग उजनीतून सोडण्यात येत आहे. त्यातच वीर धरणातून ५७३७ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा दुथडी वाहत आहे. पाण्यातील मंदिरे पाण्यात गेली आहेत. यामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून, पंढरपुरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पाण्याची पातळी वाढल्यामुळे चंद्रभागेवरील जुना दगडी पूल दोन…

Read More

घरासमोर खेळणाऱ्या तीन वर्षीय बालकावर पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने केला हल्ला:बागरोजा हडको परिसरातील हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

शहरातील मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बागरोजा परिसरातील जुन्या साताळकर हॉस्पिटल परिसरात घरासमोर खेळणाऱ्या एका तीन वर्षीय बालकावर मोकाट कुत्र्याने मंगळवारी दुपारी हल्ला केला. मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्याच्या आईन . बागरोजा परिसरातील एक तीन वर्षीय मुलगा घरासमोर खेळत असताना मोकाट कुत्र्याने पाठीमागून त्याच्यावर झडप घालून हल्ला केला. यात बालकाच्या खांद्याला…

Read More

गुरूपाैर्णिमा उत्सव:शिर्डीत तीन लाखांवर येणार भाविक, आज 24 तास सुरू राहणार साई मंदिर‎

शिर्डीत ११७ व्या गुरुपौर्णिमा उत्सवासाठी शिर्डी सज्ज झाली आहे. मंगळवारपासून भाविक दाखल होण्यास सुरूवात झाली. ३० जुलैपर्यंत तीन लाखांहून अधिक भाविक उत्सवाला उपस्थित राहतील, असा अंदाज श्री साईबाबा संस्थानने व्यक्त केला. गतवर्षीपेक्षा ही संख्या ५० हजारांवर अधिक असणार आहे. यंदा चार लाख भाविकांच्या दर्शनाचे नियोजन केले आहे. मुख्य दिवशी म्हणजे २९ जुलै रोजी साई मंदिर…

Read More

आयपीएस प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन:युवा शक्तीच राष्ट्रशक्ती- हजारे, जलसंधारण आणि पारदर्शक प्रशासनाचे दिले धडे‎

युवा शक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे. आजचे युवक-युवती हेच उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. प्रामाणिकपणा, त्याग आणि राष्ट्रसेवेची जिद्द अंगी बाळगून काम केल्यास देश निश्चितच प्रगतीच्या शिखरावर पोहोचेल, असा प्रेरणादायी संदेश ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विविध राज्यांतील आयपीएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना दिला. हैदराबाद येथे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २० आयपीएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी ग्रामविकास आणि पाणलोट क्षेत्र विकासाचा अभ्यास…

Read More

संजय दत्त@67: सल्लूने BMW दिली, किल्ली समुद्रात फेकली:इंदिरा गांधी म्हणाल्या- बोर्डिंगमध्ये पाठवा; राजेश खन्ना – ऋषी कपूरला मारण्यास गेला होता संजूबाबा

वर्ष होते 1994. मुंबईतील ठाणे मध्यवर्ती कारागृहातील सर्वाधिक कडक सुरक्षा असलेल्या अंडा बॅरेकमध्ये बंद असलेला एक आरोपी रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणींची वाट पाहत होता. लोखंडी सळ्यांमागे दोन्ही बहिणींनी त्याच्या हातावर राखी बांधली, पण त्या भावाचा खिसा पूर्णपणे रिकामा होता. देण्यासाठी ना कोणती भेट होती, ना पैसे. काही क्षण तो शांत राहिला. मग त्याने कारागृहाच्या कॅन्टीनमधून…

Read More

आज वेरूळ येथे लाखो भाविकांसह गुरुपौर्णिमा सोहळा साजरा होणार:भारतातील सर्वात मोठी जगद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या मूर्तीची होणार पूजा‎

संतपरंपरेची पवित्र भूमी असलेल्या श्रीक्षेत्र वेरूळ येथे २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होणार आहे. ब्रह्मलीन जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या श्री संत जनार्दन स्वामी आश्रमात महाराष्ट्रातून लाखो बाबाजी भक्त दाखल होणार आहेत. मिरवणूक आणि पाद्यपूजनाचा मुख्य कार्यक्रम : आश्रमाचे उत्तराधिकारी जगद्गुरू स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या शुभहस्ते आणि…

Read More

युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता उद्योग-व्यवसायाकडे वळावे:‘चावडी बिझनेस ट्रेनिंग सेंटर'' शुभारंभाप्रसंगी तहसीलदार चावडे यांचे प्रतिपादन‎

रोजगारनिर्मितीसाठी स्थानिक पातळीवर अधिक प्रभावी प्रयत्न होणे आवश्यक असून, युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता उद्योग-व्यवसायाकडे वळावे. त्यासाठी चावडीसारख्या संस्था देत असलेले मार्गदर्शन व प्रशिक्षण अत्यंत प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन तहसीलदार कैलास चावडे यांनी केले. ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवती, शेतकरी, महिला बचत गट आणि नवउद्योजकांना शेतीपूरक व्यवसाय, लघुउद्योग व उद्योग उभारणीचे प्रशिक्षण देणाऱ्या चावडी बिझनेस…

Read More

देशभरात पाऊस, गुजरातेत कारखान्यांतील काम थांबले:मध्यप्रदेश – छत्तीसगडमध्ये रेड अलर्ट; चारधाम यात्रा 2 दिवसांसाठी रोखण्यात आली

मान्सून सर्वात सक्रिय टप्प्यात पोहोचला आहे. यावेळी देशावर दोन प्रणाली (सिस्टम) सक्रिय आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आज ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगडमधून पुढे सरकत आहे. याचा परिणाम लक्षात घेता, आयएमडीने पुढील 4-5 दिवसांत वायव्य आणि मध्य भारतात सामान्यपेक्षा जास्त आणि पुढील 5-6 दिवसांत पूर्व भारतात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गुजरातमध्ये मुसळधार…

Read More