हेल्मेट न घातल्यास एक हजारांचा दंड, शनिवारपासून अंमलबजावणी:शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाईनंतर सर्वसामान्यांवर नजर
संपूर्ण जिल्ह्यात १ ऑगस्टपासून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटची सक्ती अत्यंत कडकपणे लागू केली जाणार आहे. रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी (झिरो फॅटिलिटी) पोलिस प्रशासनाने हा कठोर निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ ऑगस्टपासून कोणतीही पूर्व-जनजागृती न करता थेट दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे. मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकीवर बसल्याबरोबर हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून नियम…