Headlines

दिव्य मराठी इन्व्हेस्टिगेशन‎:बंदी असतानाही गायरान जमिनीवर प्लॉट्स पाडून पिंप्री मोंढाळेत विक्री, पारोळा तालुक्यात कुंपणानेच शेत खाल्ले

पारोळा तालुक्यातील पिंप्री मोंढाळे येथे शासकीय यंत्रणेच्या संगनमताने २ एकर गायरान जमिनीवर २०० प्लॉट्स पाडून बेकायदेशीर खरेदी-विक्रीचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. त्याचे पुरावे ‘दिव्य मराठी’कडे आहेत. गायरान जमीन विक्रीस बंदी असल्याने मूळ सातबारा उतारा कोराच आहे. मात्र तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत नमुना नं. ८ वर वाढीव बेकायदेशीर नोंदी करून लोकांना मालकी हक्क…

Read More

ख्रिश्चन झालेल्या महिलेसह 30 कुटुंबे झाली पुन्हा हिंदू:सोलापुरात मातृशक्ती आयाम संघटनेची मोहीम

‘माझ्या मानेला गाठ असल्याने मी वारंवार आजारी पडत होते. काही लोकांच्या सांगण्यावरून मी प्रार्थनेसाठी गेले. तिथे मला आजारपणातून बरे होण्यासाठी परंपरा बदलण्यास सांगण्यात आले. विधी करून माझा प्रवेश निश्चित झाला. मात्र तीन वर्षे होऊनही मला आजारपणातून सुटका मिळाली नाही. घरी पूजा करण्यासही मनाई होती. नंतर समुपदेशनामुळे मी पुन्हा स्वधर्मात आले…’ ख्रिश्चन धर्मातून पुन्हा हिंदू धर्मात…

Read More

160 कोटींचा शालार्थ आयडी घोटाळा:11 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणाच्या तपासात २०१४ ते २०२५ या ११ वर्षांच्या कालावधीत बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी तपास करणाऱ्या एसआयटीने नाशिकमध्ये बुधवारी तब्बल ११ हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यात शिक्षण विभागातील बडे अधिकारी आणि भ्रष्ट संस्थाचालकांवर कारवाईची टांगती…

Read More

अमळनेरमध्ये संत सखाराम महाराज मंदिराला भीषण आग:शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज; सुदैवाने जीवितहानी टळली

अमळनेर येथील संत सखाराम महाराज यांच्या मंदिराला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीचे कारण शॉर्ट सर्किट सांगण्यात येत आहे. ही संपूर्ण लाकडाची वाडी असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अमळनेर, पारोळा, धरणगावचे अग्निशमन पथक दाखल झाले आहे. सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाहीये. आगीचे भयावह दृश्य पाहा Source link

Read More

आग्रा-मुंबई महामार्गावर 7 तासांपासून 25 किमीची वाहतूक कोंडी, व्हिडिओ:बस-ट्रकमध्ये अडकले लोक; भेरू घाटापासून मानपूरपर्यंत हजारो गाड्यांची रांग

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात आग्रा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सोमवार संध्याकाळी 4 वाजल्यापासून वाहतूक कोंडी झाली आहे. रात्री 11 वाजेपर्यंतही परिस्थिती सामान्य होऊ शकली नाही. भेरू घाटापासून मानपूर पुलापर्यंत सुमारे 25 किलोमीटर लांब वाहतूक कोंडी झाली आहे. शेकडो वाहने सुमारे 7 तासांपासून अडकली आहेत. बसेस, ट्रक आणि खाजगी गाड्यांमधून प्रवास करणारे लहान मुले, वृद्ध आणि महिला उकाडा,…

Read More

शिक्षकांना एसआयआर कामातून वगळण्याची मागणी:विज्युक्टाचे राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना साकडे; अध्यापनावर परिणाम

मंगळवारपासून सुरू झालेले मतदार यादीच्या सूक्ष्म पुन:निरीक्षणाचे (एसआयआर) काम पुन्हा शिक्षकांच्या माथी मारण्यात आले आहे. याच दिवसापासून अमरावतीसह विदर्भातील शाळाही सुरू झाल्या आहेत. यामुळे शिक्षकांनी अध्यापन करावे की शाळाबाह्य कामे करावीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशनने (विज्युक्टा) एसआयआरच्या कामासाठी स्वतंत्र मनुष्यबळाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. विज्युक्टाचे अध्यक्ष…

Read More

अमरावतीमध्ये 20 सेंद्रिय शेतकऱ्यांचा कृषी दिनी गौरव:कृषी विभागाने जिल्हा परिषदेत केला सत्कार

अमरावती जिल्ह्यात नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या २० शेतकऱ्यांचा मंगळवारी जाहीर सत्कार करण्यात आला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘कृषी दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन राज्य शासनाचा कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात करण्यात आले…

Read More

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत जनसुनावणी:अमरावतीत उद्या महिलांच्या तक्रारींवर होणार सुनावणी

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत अमरावती येथे महिलांच्या तक्रारींची जनसुनावणी होणार आहे. शुक्रवार, ३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात (डीपीसी सभागृह) दुपारी १२ वाजता ही सुनावणी सुरू होईल. महिलांवरील अन्याय-अत्याचार आणि घरगुती हिंसाचाराशी संबंधित सर्व तक्रारींवर त्या पीडित महिलांशी थेट संवाद साधणार आहेत. महिला व बालविकास विभागाने या जनसुनावणीसाठी विशेष तयारी…

Read More

नवी मुंबईत धक्कादायक प्रकार!:मनपा रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे 8 महिन्यांच्या गर्भवतीचा बळी, नागरिकांकडून संताप

राज्यातील आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी सातत्याने होत असली, तरी विशेषतः शासकीय रुग्णालयांची स्थिती आजही अत्यंत विदारक आहे. अस्वच्छता, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, कर्मचाऱ्यांची वानवा आणि कोलमडलेली यंत्रणा यामुळे रुग्णांना नाहक मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. या ढिसाळ कारभाराचे भीषण उदाहरण काही दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यात पाहायला मिळाले होते. तिथे रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचे कारण सांगत एका गरोदर…

Read More

ट्रक वाहतुकीला मुभा, एसटीची चाके थांबवली:विद्यार्थी, काँग्रेसच्या चक्काजामनंतर दोन तासांनी बस सेवा सुरू

धामणगाव रेल्वे येथे रस्त्याच्या कामामुळे एसटी बस वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती, तर ट्रकना मात्र मुभा होती. या विरोधात विद्यार्थी आणि काँग्रेसने आज चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनानंतर प्रशासनाने नमते घेत दोन तासांत बस सेवा पूर्ववत केली. शहरातील शास्त्री चौक ते सेफला हायस्कूल या महत्त्वाच्या मार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने एसटी बस वाहतुकीला बंदी घालण्यात आली…

Read More